वंचित बहुजन आघाडी तर्फे पुण्यात वसंत मोरे यांना उमेदवारी..

पुणे : लोकसभा निवडणुकीत पुणे मतदार संघातील लढत चुरशीची ठरणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडी ने नवीन पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीकडून पुण्याच्या जागेवर वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपकडून मुरलीधर मोहोळ, तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली गेली आहे त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. वसंत मोरे यांनी देखील दंड थोपटल्याने पुण्यातील लोकसभेची लढत अधिक चुरशीची होणार आहे.
वंचितने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात वंचित उमेदवार देणार नाही, अशी घोषणा देखील केली आहे. बारामतीत शरद पवार गटाला वंचितचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलंय.
वंचितकडून जाहीर झालेल्या यादीत नांदेडच्या जागेवर अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिलीये. तर परभणीतून बाबासाहेब उगले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मधून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत