दि.२५ मार्च २०२४. जागर -६ वा. राजाराम सूर्यवंशी .


जोतिबांचा ६ वा उन्मेष म्हणजे असहकार ! अन्यायाविरुध्द असहकाराच्या प्रतिकाराची शिकवण देणारे भारतातील पहिले युग पुरुष म्हणजे महात्मा जोतिबा फुले . जोतिबांच्या या चळवळीच्या वेळी म. गांधींचा जन्म ही झाला नव्हता !
सन १८६० सालातली गोष्ट आहे . पुणे शहरात एका न्हावी बांधवाने चांगले घर बांधले होते . वास्तुशांतीसाठी त्याने काही ब्राह्मण बोलावले होते . द्रव्यलोभाने त्या ब्राह्मणांनी गुपचुप ही वास्तुशांती केली . तरीही पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांच्या कानापर्यंत ही बातमी पोहचलीच. वास्तुशांती करणाऱ्या ब्राह्मणांवर इतर कर्मठांनी बहिष्काराचे शस्त्र उचलले . तसाच बहिष्कार त्या न्हावी बांधवांवरही कर्मठांनी टाकला .
या सामाजिक अन्यायाविरुध्दसंबंधी पुण्यातील न्हावी बांधव जोतिबांकडे गेले.त्या न्हावी बांधवांना जोतिबांनी सल्ला दिला की , “जे ब्राह्मण बहिष्कार पुकारतात त्यांच्या हजामती न्हाव्यांनी करु नयेत ” .त्याप्रमाणे न्हावी मंडळींची सभा होऊन त्यांनी तसा ठराव केला .अन्यायाविरुध्द असहकाराच्या मार्गाने प्रतिकाराची शिकवण देणारे भारतातील पहिले महापुरुष म्हणजे जोतिबा.त्या चळवळीच्या वेळी म.गांधींचा जन्मही झाला नव्हता .म्हणून महात्मा जोतीराव फुले हे मला कायमच आपले राष्ट्रपिता वाटतं आले आहेत !
Comment
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत