भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने होणार तुळजापूर मध्ये मे महिन्यात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांची घेतली धाराशिव जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी भेट
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
तुळजापूर ऐतिहासिक शहरात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने तुळजापूर आणि परिसरामध्ये बौद्ध संस्कारांचं जतन आणि पठण व्हावं बौद्ध संस्कार प्रत्येक घरा घरांमध्ये रुजावे बौद्ध संस्कारांची एक नाळ शहरात आणि परिसरात निर्माण व्हावी जिल्ह्यामध्ये समता स्वतंत्र्य आणि बंधुता समानता आणि अखंडता निर्माण व्हावी बौध्दांचे संस्कार प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी तुळजापूर या ऐतिहासिक शहरात मे महिन्यात बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे या संदर्भात ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची धाराशिव जिल्ह्याचे दक्षिण पदाधिकारी जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे ताई जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे , जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम , जिल्हा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे , जिल्हा पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे , जिल्हा संघटक विजय बनसोडे , जिल्हा कार्यालयीन सचिव दादासाहेब बनसोडे , आदींनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची भेट घेऊन मे महिन्यामध्ये होणाऱ्या धम्म परिषदे साठी निमंत्रण देण्यात आले आहे .
बौद्ध संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी धाराशिव दक्षिण विभाग कटिबद्ध आसुन होऊ घातलेल्या बौद्ध धम्म परिषदे साठी बौद्ध बांधवांनी व आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रसार आणि प्रचार खुप मोठ्या प्रमाणात होणार आहे समाजातील धाराशिव जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर तमाम बौद्ध बांधव , बौद्धाचार्य , केंद्रीय शिक्षक, माजी श्रामनेर , शिक्षक , शासकीय, निम शासकीय कर्मचारी या सर्वांनी तुळजापुरात होऊ घातलेल्या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहून आपल्या सर्वांचे आदर्श आदरणीय डॉ भीमराव आंबेडकर यांना ऐकण्यासाठी आहे आपण उपस्थित रहावे आसे अवहान दक्षिण जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत