उर्दू माध्यमातील शाळेत शिक्षक निवडीच्या विरोधात पुणे शिक्षण आयुक्तांना निवेदन..

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती 2022 अंतर्गत फेझ 1 मध्ये शिक्षकांना 25 फेब्रुवारी 2024 रोजी नियुक्ती लेटर देण्यात आले आहेत. त्यात असे निदर्शनास येते की उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली आहे. तरी ही नियुक्ती शासनाच्या धोरणास अनुसरून नाही व यातून शाळेत विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जसे
१. निवड झालेले उमेदवार उर्दू माध्यमातून शिकवण्यास असमर्थ ठरतील.
२. उमेदवारांची प्रथम भाषा उर्दू नसल्यामुळे त्यांना इतर विषय शिकवण्यास अडचण निर्माण होईल.
३. हे उमेदवार इतर विषय शिकवण्याचा समर्थ असल्यामुळे त्यांचे कार्यभार पूर्ण बसणार नाही.
४. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
या संदर्भातील पत्रातील मुद्दा क्रमांक ०७ मध्ये उमेदवारांचे शिक्षक पदी नियुक्तीसाठी माध्यम ठरवताना त्यांच्या इयत्ता १० वी चे प्रथम भाषा विषयाचे माध्यम ग्राह्य धरण्यात येइल असे जाहीर करण्यात आले आहे.
तरी असे निवेदनात नमूद करण्यात आले की उर्दू माध्यमात शिक्षकांची नियुक्ती करताना शैक्षणिक धोरणास अनुसरून उर्दू माध्यमातून १० वी पर्यंत शिक्षण शिक्षण झालेल्या उमेदवारांनाच नियुक्ती देण्यात यावी.
निवेदन देताना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष हनुमंत चव्हण, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतीश वाघमारे, सचिव सय्यद मुस्तफा, सोफियान सर यादी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत