महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन दुरुस्तीसाठी आटपाडीत आजपासून  बेमुदत धरणे आंदोलन सुरू 

अनेक संघटनांचा पाठिंबा..

सांगली दि. ४ (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. आटपाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन या पवित्र वास्तूची दुरावस्था झालेली आहे. सदर वास्तूची सत्वर दुरुस्ती करून सामाजिक कार्यासाठी वापर करावा या मागणीसाठी तहसील कार्यालय आटपाडी येथे आज सोमवार दिनांक ०४/०३/२०२४ पासून आटपाडी तालुक्यातील तमाम आंबेडकर प्रेमी व जनतेच्या वतीने पंचायत समितीसमोर  बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती आटपाडी यांना अनेक वेळा निवेदनात देऊनही प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. म्हणून हे पाऊल आंदोलकांनी उचलले आहे. आटपाडी तहसीलदार यांना आंबेडकर प्रेमी जनतेचे निवेदन दिले आहे.  

आटपाडी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत दिनांक २४/२/१९८६ रोजी बचत धामची इमारत बांधण्यात आलेली होती, सदर बचत धाम इमारतीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आटपाडी असे नामकरण करण्यात आलेले होते. सदर वास्तूमध्ये अनेक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. त्यामध्ये शासकीय अधिका-यांच्या बैठका, आमसभा, जनता दरबार, सांस्कृतिक कार्यक्रम, गोर-गरीब लोकांची लग्ने अल्प दरात होत होती. अनेक कार्यक्रम सदरच्या वास्तुत होत होते, परंतु सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन ही पवित्र वास्तू सध्या अडगळीत पडलेली आहे. सदर वास्तूची दुरावस्था झालेली आहे. दरवाजा, काचा फुटलेल्या आहेत. घाणीचे साम्राज्य झालेले आहे. लाईट आप नाही. पावसाळ्यात इमारती गळती होते. रंगरंगोटी नाही. कसलीही दरुस्ती जो लिपीक समिक मही माही, ठळक अक्षरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दुरवस्था झालेली आहे. नाही, सदर पवित्र वास्तू याबाबतचे लेखी निवेदन दिनांक ९/६/२०२३ रोजी  गट विकास अधिकारी  पंचायत समिती आटपाडी व संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष चर्चा करून निवेदन दिलेली आहत परत् अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. पवित्र वास्तूची सत्वर दुरुस्ती करणेत यावी, या मागणीसाठी  आटपाडी तहसील कार्यालय आटपाडी येथे बेमुदत धरेन आंदोलन सुरू केले आहे. 

या आंदोलनात  विलास खरात, आप्पा खरात, यशवंत मोटे, मोहन खरात, नंदकुमार खरात, शरद मोटे अशोक लांडगे, ॲड. सुयश सर, दिलीप कॉम्रेड, पुजारी सर्, आनंदराव केशव ऐवेळे, सहभागी झाले आहेत.

या निवेदनाची प्रत, खासदार संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली, गटविकास अधिकारी, पंचायत समिती आटपाडी, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आटपाडी यांना देण्यात आली आहे..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!