आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारतानं न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. वेलिंग्टन इथल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानं, न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. सध्या गुणतालिकेत भारत विजयाच्या ६४ पूर्णांक ६८ शतांश टक्केवारीसह पहिल्या, साठ टक्क्यासह न्यूझीलंड दुसऱ्या आणि ६४ पूर्णांक ९ शतांश टक्केवारीसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या ३ असा १ असा आघाडीवर असून, मालिकेतला शेवटचा सामना जिंकला तर गुणतक्त्यातलं भारताचं पहिलं स्थान आणखी मजबूत होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत