बौद्धजन पंचायत समिती संस्थेच्या वतीने सरसेनानी आनंदराज साहेबांचा सत्कार..

दापोली प्रतिनिधी : बौद्धजन पंचायत समितीने मा.आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शाखाच्या सहकार्यातून सात मजळ्याची इमारत बांधण्यासाठी प्रचंड कष्टाने आणि मेहनतीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला कायदेशीर परवानगी मिळाली त्या निमित्ताने शनिवार दिनांक २/३/२०२४ रोजी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा मंगलमय सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
त्यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, कामगार नेते रमेश मा जाधव अध्यक्ष जनसंपर्क व प्रसिद्धी समिती यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच अपना बाजार संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले पांडुरंग साळवी यांचा ही संस्थे च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपसभापती विनोद मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, खाजिनदार नागसेन गमरे, संस्कार विभाग अध्यक्ष मंगेश पवार, सेकेटरी मनोहर मोरे, कार्यकारी मंडळ/ व्यवस्थापक मंडळ , बौद्धाचार्य माहिला मंडळ आधी उपस्थित होते.
आपला नम्र
कामगार नेते रमेश मारुती जाधव अध्यक्ष
जनसंपर्क व प्रसिद्धी समिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत