महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविदर्भ

जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात ‘वंचित’चे आंदोलना मुळे सभागृहाचे दिड कोटीं निधीतून नूतनीकरण होणार.

राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश

अकोला : शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जिजाऊ सभागृहाचे परिसरात सफाई अभियान प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले होते. तसेच शहरातील २१ प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येवून निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने अकोला येथे माँ जिजाऊ हॉलची हॅम ट्रेनिंग सेंटर करीता बळकटीकरण व नुतनीकरण करणे साठी दिड कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.सबब माँ जिजाऊ साहेबांचे नावावर असलेल्या सभागृहाची दुरावस्था संपली आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.
अकोल्यातील रेल्वे स्टेशन रोडवरील माँ जिजाऊ साहेबांची दुरवस्था पाहता वंचितने राजमाता जिजाऊ माँ साहेब आंदोलन केले होते. जिजाऊ सभागृह सफाई अभियानात प्रा अंजलीताई आंबेडकर तसेच युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वत: परिसराची सफाई करीत सहभाग नोंदविला होता.त्याच वेळी शहरातील इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिविल लाईन्स चौक, मोठी उमरी चौक, अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक, हनुमान चौक, जठारपेठ चौक, शिवाजी पार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवनी चौक, रतनलाल प्लॉट चौक, महाकाली/ नेहरू पार्क, शिवर चौक या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले होते.

दरम्यान जिजाऊ जयंती साजरी करतना १९ फेब्रुवारीपर्यंत जिजाऊ सभागृहाचे नूतनीकरण न झाल्यास शहरात रथ यात्रा काढून जनतेकडून पाच-पाच रुपये गोळा करून सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा इशारा प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी दिला होता.

कार्यकारी अभियंता दिशाभूल करीत संतप्त पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी आरडीसी यांच्या दालनात ठिय्या मांडला. प्रचंड घोषणा देण्यात आल्या आणि कार्यकारी अभियंता व विभागीय अभियंता यांच्याकडे लोकवर्गणी मागणी करीत महिलांनी पदर पसरले. अधिकारी दाद देत नसल्याने त्यांचे अंगावरून ५ – ५ रुपये ओवाळून सभागृहाचा निधी गोळा करायला सुरुवात झाली आणि स्वक्षरीच्चे गठ्ठे त्यांना सोपविण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या अंजलीताई आंबेडकर ह्यांनी १९ फेब्रुवारी पर्यंत काम करण्याचें दिलेल्या अल्टिमेटम मुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला ह्यांनी ई-निविदा सूचना क्रमांक ३८ / २०२३-२०२४ जावक क्रमांक ११७० / ईनिसु-३८/ निलि /२०२३ / दिनांक १४/०२/२०२४ प्रकाशित केली असून माँ जिजाऊ हॉलची हॅम ट्रेनिंग सेंटर करीता बळकटीकरण व नुतनीकरण करणे कामासाठी दिड कोटीच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
094221 60101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!