अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन योजना लागू करणार. – आदिती तटकरे

रत्नागिरी : ”राज्यभरात सुमारे १ लाख २० हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून १२वी मधून सूट देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल”, अशी मोठी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली आहे.
ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही, अशा पहिल्या वर्षी ३६ हजार अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. खेड येथील कै.द.ग.तटकरे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत