जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत-चव्हाण

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर वाढलेल्या पोटावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनीही अजित पवारांविरोधात खोचक टोलेबाजी केली. “अजितदादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला, तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अॅब्ज’ केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो,” असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.
अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांच्या टोलेबाजीला उत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. राखी सावंत नेहमी काहीतरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा प्रयत्न करते. तसेच जितेंद्र आव्हाड करत असतात, अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत