महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याची हबेहुब प्रतिकृती बनविणाऱ्या जनसेवा मंडळाचा सन्मान

यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीने महाराष्ट्रा समोर एक नवा आदर्श निर्माण केला .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

सामाजिक उपक्रमातून समाज प्रबोधनाचे काम करत महाराष्ट्रातील युवा पुढीला प्रेरणा देण्याचे प्रामुख्याने काम करणाऱ्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनी प्रा.लि.सोलापूर या कंपनीने आज महाराष्ट्रा समोर एक नवा आदर्श निर्माण केला
२०२३ च्या दिवाळी मध्ये कोल्हापूर जिल्हातील इचलकरंजी येथील जनसेवक युवक मंडळ २१७ वजनात या मंडळाने नळदुर्गच्या किल्याची हुबेहूब प्रतिकृती निर्माण केली होती..अत्यंत सुंदर असा नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला बनवला होता विशेष म्हणजे हा किल्ला बनवणारे सगळे युवक वर्ग हे कामगार आहेत दिवसभर काम करणे आणि रात्रीच्या वेळी किल्ला बनवणे असा त्यांचा छंद होता या मंडळात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन हि मिळाले आणी सर्व सन उत्सव एकत्र साजरे करतातं यामधुन सामाजिक प्राचीन वारसा जपत महाराष्ट्रात सर्वात मोठा आणी ऐतिहासिक किल्ला बणवणार्‍या व हा किल्ला बनवणाऱ्या मंडळाच्या एकाही सदस्यांनी आजपर्यंत नळदुर्गचा किल्ला कधीही पहिला नाही फक्त माहिती गोळा करुन त्यांनी हा ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहुब किल्ला बनवुन समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे .
हा ऐतिहसिक नळदुर्ग येथील किल्ल्याचा दुबेहुब देखावा बनविणाऱ्या मध्ये योगेश भोईटे ऋषीं भोईटे अमीर मुलानी सूरज कोटकर आकाश वरपे यश हवळ सलमान पठाण सोहेल इचलकरंजीकर , शाहरुख मुलाणी.. सलमान मुलाणी.. कुबेर कट्टीमणी.. आकाश कोटकर.. साहिल नांदणीवाले.. अथर्व लायकर.. सुहास मराठे.. कयूम इचलकरंजीकर असे सर्व जातीधर्माचे युवक किल्ला बनवण्यात अग्रेसर होते. त्यामुळे युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांनी याबाबत माहिती गोळा करण्यास सांगितले.. त्यांच्या आदेशानुसार युनिटीचे जनसंपर्क अधीकारी व नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी या तरुणांचा पत्ता शोधून काढला.. त्यावर लगेच विलंब न करता कफिल मौलवी जयधवलं करकमकर आणि वैशालीताई जैन यांनी युनिटीकडून या मंडळाला ५००० रुपये रोख रक्कमे सह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यूनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांच्या आदेशानुसार आज युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी स्वतः इचलकरंजी या गावात जावून या मंडळाची भेट घेवून त्यांचा सन्मान केला यावेळी जनसेवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते खूप आनंदी झाले होते अत्यंत परिवारिक असा कार्यकम संम्पन्न झाला..
यावेळी जनसंपर्क अधिकारी व नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सन्मानपत्र व ५००० रु. दिले यावेळी सगळे कार्यकर्ते भारावून गेले होते .
त्यांच्या गावात जाऊन मंडळाचे कौतुक करणाऱ्या युनिटीचे आणी खास करुन कफिल मौलवी यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.. अशा कलेला प्रोत्साहन देणे सुद्धा खूप महत्वाचे आहे..
यावेळी विनायक अहंकारी यांच्यासोबत नळदुर्ग मनसेचे सचिव प्रमोद कुलकर्णी.. सचिन भूमकर..अजित भूमकर.. अजय देशपांडे.. ज्ञानेश्वर केसकर.. सुदर्शन पुराणीक आणि संकेत भूमकर उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!