दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान

जिजाऊ जयंती निमित्तवंचित युवा आघाडी आयोजित अभिवादन बाईक रॅली आणि जिजाऊ ची लेक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

अकोला दि. १२

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्ताने
वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा व महानगरचे वतीने अशोक वाटिका ते जिजाऊ सभागृह “अभिवादन बाईक रॅली आणि जिजाऊ ची लेक” पुरस्कार वितरण सोहळा जिजाऊ सभागृह स्टेशन रोड अकोला येथे उत्साहात संपन्न झाला.
रॅली च्या सुरवातीला ओपन जीप्सी मध्ये माँ जिजाऊ ची प्रतिमा लावून रथ तयार करण्यात आला होता.
ज्या मध्ये जिजाऊ माँ साहेब, बाल शिवाजी महाराज, सावित्रीआई फुले यांचे वेशभूषा केलेले बालक, बालिका मुख्य आकर्षण होत्या.
त्यामागे महिला यांच्या बाईक नंतर युवक आणि युवती यांच्या बाईक होत्या.
“जय जिजाऊ,
जय शिवराय…
जय भवानी जय शिवाजी…”
अशा घोषणांनी
रॅलीत जोश वाढला होता.
अग्रसेन चौकातील वसंतराव नाईक आणि रेल्वे स्टेशन चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुषहार अर्पण करून अभिवादन करत रॅली जिजाऊ सभागृह येथे रॅली चा समारोप झाला.
रॅली नंतर
जिजाऊ ची लेक पुरस्कार वितरण सोहळ्यात
राजमाता जिजाऊ यांच्या
“जिजाऊ वंदना” गाऊन पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
पुरस्कार मध्ये
मूर्तिजापूर येथील तृतीय पंथी गुरु
मां नेहा गुरू दिलजान यांनी अनाथ मुलीला कचऱ्यातून उचलून तिला जीवन दिले आणि त्या बालिकाचे संगोपन केल्या बद्दल नेहा गुरु दिलजान यांना पुरस्कार देण्यात आला,.
त्यानंतर गुडाधी येथील आनंद आश्रम च्या संचलिका दीदी यांना पुरस्कार देण्यात आला,
सोबतच रिंकू भटकर हिच्या नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून केलेल्या युवा क्षेत्रातील कार्याची दखल घेत जिजाऊ ची लेक पुरस्कार देण्यात आला.

बाईक रॅली व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,
विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद दिंडवे,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,
भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पि जे वानखडे,युवा महासचिव राजकुमार दामोदर,
जनरल सेक्रेटरी मिलिंद इंगळे, महिला जिल्हा अध्यक्ष आम्रपाली खंडारे, युवा महानगर अध्यक्ष वैभव खडसे, पश्चिम अध्यक्ष मजहर खान,
महिला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक,
नंदकुमार डोंगरे,सिद्धार्थ देवधरीकर, मनोहर बनसोड,गजानन गवई,दादाराव पवार,सचिन शिराळे,समीर पठाण, आनंदभाऊ खंडारे,शोभाताई शेळके,ऍड मीनल मेंढे, नितीन वानखडे, ऍड सुबोध डोंगरे, कृष्णा देवकुणबी, नम्रता आठवले, जय रामा तायडे,
बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष निक्की डोंगरे, पातुर तालुका अध्यक्ष सम्राट तायडे, बाळापूर तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे, अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, तेल्हारा तालुका अध्यक्ष जिया शहा, मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष अक्षय राऊत, महासचिव रितेश यादव, नागेश उमाळे,राज बोदडे, आकाश जंजाळ, आकाश गवई, पायल कांबळे, नंदिनी ढोले,ऍड संतोष रहाटे, संजय बावणे,प्रदीप चोरे, गोपाल चव्हाण,पुरषोत्तम अहिर,
मंगळताई शिरसाट, किरणताई बोराखडे, सुवर्णा जाधव, मेघा शिराळे, निखिल गजभिये, रंजित शिरसाट, महेंद्र तायडे, नाना गावंडे, अमन गवई आणि
शिवाजी महाराजांचे वेशभूषेत प्रभास डोंगरे, संग्राम बोदडे,माँ जिजाउंच्या वेशभूषेत सिंहला शिराळे, शौर्या शिराळे, आर्या खंडारे ह्या उपस्थित होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!