बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे माणूस असल्याची जाणीव झाली व गुलामगिरी विरुद्ध बंडखोरी विकसित होत गेली–प्रबुद्ध साठे
पिंपरी चिंचवड:- जातीव्यवस्थेचे चटके लहानपणापासूनच अनुभवले व त्यातून माणूस असल्याची जाणीव व गुलामगिरी विरुद्ध बंडखोरी विकसित होत गेली, तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आगदी शालेय जीवनापासून भाषणे करण्याची आवड आणि त्यातून स्वतः मधल्या माणसाला शोधत असताना राष्ट्र निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भगवान गौतम बुद्धाला कडकडून मिट्टी मारली आणि मी माणूस झालो असे मी बौद्ध धम्म का स्वीकारला याचे विश्लेषण करीत असताना चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी प्रतिपादन केले, ते पिंपरी चिंचवड येथील शाहूनगर धम्म चक्र बुद्ध विहार येथे बोलत होते,,
आपल्या मोजक्या पण प्रभावशाली भाषणात प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले, देव धर्म जात या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडा , देव व जात या मानसिक कल्पना आहेत, माणूस व जगाची मनोधारणा बदल्याशिवाय मानवी जगाची प्रगती होणार नाही, मनाचे परिवर्तन व पावित्र्य राखणे, यासाठी बौद्ध धम्माच्या प्रज्ञा शील करुणा व मैत्री चा संस्काराने मानसिक परिवर्तन करणे हेच धम्माचे प्रयोजन आहे, यासाठी बौद्ध धम्माच्या माणुसकीच्या चांगुलपणाचा उजेड वाटत फिरतो,
महिलांनी नवरात्र उत्सव यासारख्या ब्राम्हणी वर्चस्ववादी सणाच्या नादी लागण्यापेक्षा राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, त्याग मुर्ती माता रमाई फातिमा शेख, मुक्ता साळवे इत्यादींचा आदर्श घेऊन महिलांनी आपले कुटुंब समाज व देशाचा उद्धार करावा महिला अंधश्रद्धेच्या बाहेर पडल्या कि धम्म क्रांती गतीमान होईल असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, यावेळी धम्म चक्र बुद्ध विहार चे मार्गदर्शक आदरणीय सुरेश कसबे साहेब , डॉ रवींद्र ओव्हाळ, गणेश रामटेके, आदी मान्यवर व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत