डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल बँक(शैक्षणिक जीवनातील आधार…! )

दीं.१४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त
इंजि. सोमनाथ दावणे युवामंच संचालित
या शालेय साहित्य भेटणाऱ्या बँकेचे शुभारंभ दीं.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. होणारा आहे तरी परिसरातील सर्व विद्यार्थी ,पालक ,तरुण वर्ग ,गावकरी व महिला यांनी इंजि. सोमनाथ दावणे युवामंच यांचे कार्यालय तरटगाव येथे उपस्थित राहावे ही विनंती.
तसेच महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही आपणास विनंती.
डॉ. बी.आर.अंबेडकर स्कूल बँक ही संकल्पना व संदर्भ खालील प्रमाणे
आपल्या भागातील गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी आम्ही इंजि.सोमनाथ दावणे युवामंच संचलित ही स्कूल बँक उघडत आहोत. या बँकेमध्ये गरजूवंत विद्यार्थ्यांना लागणारे शालेय साहित्य भेटणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या बँकेचा लाभ घेऊन अभ्यास करण्यासाठी शालेय साहित्य हवे असेल अश्या विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करून खाते उघडून घ्यायचे आहे.
ज्या विद्यार्थ्यांना साहित्य हवे असल्यास तो ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेमधील शिक्षकाचे शिफारस घेऊन येऊन आपल्या ह्या स्कूल बँकेमधून हवे असलेले साहित्य कर्ज रुपी मोफत घेऊन जायचे आहे. हे साहित्य गरजूवंत विद्यार्थ्यांना कर्ज स्वरूपामध्ये मिळणार आहे कर्ज स्वरूपामध्ये याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये तुम्ही शिक्षण पूर्ण करून जेव्हा उच्च पदावर जाल किंवा एखादा शासकीय खात्यामध्ये अधिकारी व्हाल तेव्हा आपल्या ह्या बँकेतून घेऊन गेलेला उदा. एखादी वही किंवा पेन तेवढेच आपल्या बँकेला परतफेड करायची आहे ,तेही तुम्ही भविष्यामध्ये नोकरी लागल्यानंतर व सक्षम झाल्यानंतरच परत फेड करायची आहे.
तरी आम्ही ह्या साहित्याची कोणतेही रोख स्वरूपामध्ये कोणाकडूनही पैसे स्वीकारणार नाही. हे अगदी मोफत असणार आहे. आपल्या स्कूल बँकेच्या माध्यमातून आपल्या भागातील एखाद्या तरी गरजवंत मुलापर्यंत आपली मदत पोहोचली आणि त्या साहित्य वापरून तो घडला तर तो विद्यार्थी भविष्यात जाऊन अनेक विद्यार्थ्यांना मदत करून घडवू शकेल व ही शृंखला कायम चालत राहील हीच या पाठीमागे संकल्पना आहे. तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना तसेच संपूर्ण देशाला आव्हान केले होते की “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” त्याप्रमाणे आमचेही युवा मंचचे विचार आहेत की शिक्षणाने समाज घडतो, शिक्षणामुळेच समाजामध्ये प्रगलबता येते ,शिक्षणामुळेच एखादे कुटुंब घडू शकते, शिक्षणामुळेच सामाजिक भान येते, शिक्षणामुळेच सामाजिक स्तर वाढतो म्हणूनच डॉ.बाबासाहेब म्हणायचे “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व ते पिणारा प्रत्येक जण डरकाळी फोडतोच” त्याप्रमाणे संपूर्ण संकल्पना ही आपल्या भागातील गरजूवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमी पडत असलेल्या शालेय साहित्यासाठी उभा करत आहोत. तरी आपण सर्वांनी स्कूल बँकेला भेट देत असताना किंवा तुम्ही येत असताना एखादा वही किंवा पेन किंवा इतर शालेय साहित्य आपण जर देऊ शकलात तर एखाद्या गरजूवंतापर्यंत ती मदत नक्कीच पोचणार आहे व त्यामधील एखाद्या विद्यार्थी घडवून तो एखादा उच्च पदावरती जाऊन अधिकारी होईल त्यामुळे तो स्वतः घडुन समज्याला घडवेल हीच संकल्पना.
पालकांना व नागरिक ,उद्योजक , देणगीदार यांना आम्ही अवहान करतो की या स्कूल बँकेला नवीन आणि जुने शालेय साहित्य स्वरूपामध्ये देणगी देता येणार आहे.
उदाहरणार्थ वही, पेन, पेन्सिल, रंग ,खडू कंपास पेटी ,शालेय बॅग व आणखी इतर शालेय साहित्य.
तरी सर्व पालकांना आम्ही आव्हान करतो की तुमच्या घरातील विद्यार्थी पाल्याचे जुनी वही जुनी पुस्तके जुने शालेय बॅग अजून इतर साहित्य जर लागणारे नसतील तर ते साहित्य आमच्या स्कूल बँकेला आणून आपण जमा करावे ते साहित्य एखाद्या गरजूवंत विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचे काम करू. उदा. तुमचा पाल्य सहावीतून सातवी मध्ये पुढील वर्गात जात असेल किंवा सातवीतून आठवी मध्ये जात असेल तर त्याच्या उरलेल्या वह्या पुस्तके गाईड पेन पेन्सिल शालेय बॅग आम्ही स्वीकारू कारण त्या इतर गरजवंत मुलांच्या शुद्धलेखनासाठी व पुढील शिक्षणासाठी उपयोगी ठरतील व वापरता येतील. तसेच आपल्या मुलाचे पाठीमागील वर्षाची पुस्तके पाठीमागील वर्षातील शालेय दप्तर असे आपल्याला जे जे काही लागत नाही ते ते साहित्य आमची स्कूल बँक जमा करून घेणार आहे.
परंतु तुम्हाला आपल्या स्कूल बँकेपर्यंत येऊन हे साहित्य जमा करावे लागेल आणि ज्यांना हे साहित्य गरजेचे आहे त्यांनीही आपल्या शिक्षकांच्या शिफारसीने या स्कूल बँकेपर्यंत येऊन हे साहित्य घेऊन गेले पाहिजे असे मी आमचे इंजि. सोमनाथ दावणे युवामंचचे वतीने आपणास आवाहन करतो आहे तरी आपण सर्वांनी या संकल्पनेला पाठिंबा देऊन आपल्या भागातील एक प्रकारची शैक्षणिक क्रांती करण्यासाठी सहभाग नोंदवावा ही विनंती.
इंजि. सोमनाथ दावणे
(B.Tech Civil Engg. , DCE )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



