
मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती, वेतन, व पदच्युती संदर्भात या विधेयकात तरतुदी आहेत. प्रधानमंत्री, एक केंद्रीय मंत्री, लोकसभेतले विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता यांच्या निवड समितीने दिलेल्या शिफारसीनुसार राष्ट्रपती मुख्य निवडणुक आयुक्त आणि निवडणुक आयुक्तांची नेमणूक करतील, अशी तरतूद या विधेयकात आहे. निवडणूक आयुक्त नियुक्त विधेयकाला राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी आज मान्यता दिली. संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत