
वित्त मंत्रालयातील सहसचिव जुही मुखर्जी आणि एडीबीचे भारतासाठीचे उपसंचालक आणि प्रभारी अधिकारी, होयुन जेओंग यांनी काल या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे उत्पादन, अधिक स्पर्धात्मक होऊन पुरवठा साखळी मजबूत होईल. भारत सरकार आणि आशियाई विकास बँक म्हणजे एडीबी यांनी देशातील औद्योगिक पट्ट्याच्या उभारणीसाठी २५ कोटी डॉलर्सच्या धोरण-आधारित कर्जासंबधी करार केला आहे. जागतिक मूल्य साखळीला जोडलं गेल्यामुळे कृषी व्यवसाय, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, अन्न आणि पेये, अवजड यंत्रसामग्री, औषधनिर्माण आणि कापड यांसारख्या औद्योगिक क्षेत्रात तसंच औद्योगिक पट्ट्यामधील समाविष्ट राज्यांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तसंच ८२ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-मेरठ प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली म्हणजे RRTS कॉरिडॉरच्या बांधकामासाठीही वित्तपुरवठा करण्यात येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत