महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यामध्ये ९ ‘ईएसआयसी’ (ESIC) रुग्णालयांची केली जाणार उभारणी…

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं काल ही माहिती दिली. कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि उत्तराखंड राज्यामध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी इथल्या ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशे वीस करण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली. तसंच अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयालाही मंजुरी देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत