
देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभर आदरांजली वाहिली आहे. आज संसद भवन परिसरात या शहिदांना आदरांजली वाहिली . दहशतवादी हल्ला निष्प्रभ ठरवणाऱ्यांप्रति देश सदैव ऋणी राहील तसंच त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा वक्तव्यातून राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु यांनी शहीद सुरक्षा रक्षकांना आदरांजली वाहिली आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे, पी, नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रल्हाद जोशी आदींनी उपस्थित राहून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत