I.N.D.I.A. Alliance: कांग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर ही पहिलीच बैठक आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने तीन राज्यात सत्ता मिळवली, तर काँग्रेसने एक राज्य काबीज केले. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार आहे.
मीटिंगमध्ये सीट शेअरिंग आणि टॉप अजेंडा ठरू शकतोआगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती आणि जागावाटवाबाबत चर्चा होऊ शकते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत