तुळजापूर येथे भव्य रॅली ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन .. पूर्णाकृती पुतळा लवकर व्हावा या मागणीला जोर.

प्रतिनिधी : आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, आनंद बुध्द विहार समिती, सिद्धार्थ तरुण मंडळ तसेच शहर व तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
तुळजापूर शहरातील सिद्धार्थ नगर येथील सिद्धार्थ तरुण मंडळ च्या पदाधिकारी व महिला उपासिका यांनी मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या प्रतिमेसह शहरातून भव्य अशा रॅलीचे आयोजन केले होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे स्वतः आयुष्यभर दुःख अपमान गरिबी च्या वणव्यात जगले पण समाजाला प्रगतीचा तेजोमय प्रकाश दिला हा संदेश देण्यासाठी सर्वांनी हातात मेणबत्ती घेऊन या रॅली मध्ये सहभाग घेतला व 4 वर्षांपासून अविरत तेवत असलेल्या विशाल मेणबत्ती ने बाबासाहेबांना अभिवादन केले.
भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेने पुतळ्याच्या ठिकाणी व आनंद बुध्द विहार हडको येथे सामुदायिक बुध्द वंदनेचा कार्यक्रम घेतला, यावेळी जिल्हा शाखेचे पदाधिकारी माजी जिल्हा सरचिटणीस बोधाचर्य आयु. सुकेशन ढेपे, समता सैनिक दल प्रमुख आयु. अनिल सरतापे, पर्यटन सचिव दत्ता माने, हिशोब तपासनीस देविदास कदम, वंचित बहुजन आघाडी चे मिलिंद दादा रोकडे, जीवन कदम इत्यादी तर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे सरचिटणीस आयु. विठ्लराव सूरते, महिला विभाग प्रमुख व समता सैनिक लक्ष्मी ताई कदम, शहर शाखा अध्यक्ष अप्सरा ताई कदम, सचिव सुमित्रा ताई माने यावेळी उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या धम्म संस्थेत सक्रिय झाल्यास खऱ्या अर्थाने बोधिसत्वाला अभिवादन होईल असे मत व्यक्त करण्यात आले.
रॅली नंतर सर्वजण आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्या साठी एकत्र आले. यावेशी खुशी कदम, शिवानी कदम व संचीता कदम यांनी सुंदर गीत सादर केले तर इशिता सागर कदम हिने गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे आयु. मिलिंद दादा रोकडे, दत्ता माने, अप्सरा ताई कदम, लक्ष्मी ताई कदम यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले व बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाला सिद्धार्थ नगर येथील आयु. श्रीकांत चौधरी, अनिकेत सोनवणे, अमित कदम, आत्माराम सोनवणे, अजित सोनवणे, शुभांगी कदम, नंदिनी सोनवणे, मीना कदम, सुवर्णा सोनवणे, पंचशीला गोरे तर हडको येथून स्वाती सोनवणे, दिपाली कदम, माधुरी नागटिळक, मंजुताई बनसोडे, सोनाली सिध्दगणेश, दीक्षा सिध्दगणेश, करिश्मा कदम, मंजु वाघमारे, वैशाली वडवराव यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक उपासिका
उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी बाळासाहेब अनंतराव कदम यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुकेशन ढेपे यांनी तर आभार प्रदर्शन आयु. देविदास कदम यांनी केले.
महामानवाला विनम्र अभिवादन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
खूप छान..!
Thanks