महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
हिवाळी अधिवेशन तसेच नवीन वर्ष तोंडावर आसल्यामुळे हॉटेलचे दर वाढले …

अनेक हॉटेलमध्ये नवीन वर्षांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले असून त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. अनेक नवीन हॉटेल्स नागपूरकरांची ‘टेस्ट ऑफ एन्जॉय’ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशामुळे शहरातील मोठ्या हॉटेलमधील खोल्या बूक आहेत. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन राहणार आहेत. त्यानुषंगाने मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते यांचा फौजफाटा शहरात दाखल होत आहे. त्यांनी शहरातील हॉटेलातील खोल्या अॅडव्हान्समध्ये बुक केल्या आहेत.
हिवाळी अधिवेशन त्यापाठोपाठ आलेल्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चैतन्याचे वारे वाहताहेत. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत