
बनावट भारतीय चलनी नोटांची सीमेपलीकडील भागात ने -आण करण्याच्या काही संशयित व्यक्तींनी रचलेल्या मोठ्या कटाशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA ने छापे टाकले. या छाप्यांमध्ये उत्तर प्रदेशातील एका घरातून 500, 200 आणि 100 रुपयांच्या सहा हजार रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा, चलन छपाईच्या कागदांसह जप्त करण्यात आल्या. बनावट नोटा तयार करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहार या चार राज्यांमध्ये घातलेल्या छाप्यांमधून बनावट नोटा, नोटांच्या छपाईसाठी वापरला जाणारा कागद आणि डिजिटल उपकरणं अशी सामग्री जप्त केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत