६ डिसेंबर २०२२ रोजी येताना….

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन बाबत या वर्षी लाखो भिमबांधव येणार आहेत…
◼ भारत देशा मधुन व महाराष्ट्र मधील विविध जिल्हा मधून भिमबांधव चैत्यभुमी दादर येथे येतात तर मुंबई व ठाणे परिसर तसेच नवी मुंबई येथील भिमबांधवानी प्रथम भारत व महाराष्ट्र मधून येणारा भिमबांधवा ना महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यास प्रथम प्राधान्य द्यावे कारण आपण चैत्यभुमी जवळ आहे आपण कधीही दर्शन घेऊ शकतो
◼ दादर रेल्वे स्टेशन कडून चैत्यभुमी कडे जाणारे भिमबांधव यांनी घोषणा मध्ये कोणता समाजाला न दुखविता सभ्यपणे अगदी शांततापुर्ण द्यावे
◼ चैत्यभुमी व शिवाजी पार्क वर भिमबांधव पुस्तके खरेदी करता पण पिशवी नसल्यामुळे हातात पुस्तके घेऊन यावे लागते त्यामुळे पुस्तके खराब होतात तरी येताना पिशवी घेऊन यावे त्यामुळे पुस्तके ठेवता येऊ शकेल.
◼ गणेश विर्सजन दिवशी मराठी न्यूज चॅनल ( झी मराठी न्यूज, स्टार मराठी न्युज, आय बी.एन लोकमत मराठी न्यूज, लोकशाही मराठी न्युज तसेच TV-9 मराठी न्यूज) दिवस भर LIVE प्रक्षेपण ठेवता पण ६ डिसेंबर रोजी अगदी अल्प बातमी देतात तर आपण सर्व भिमबांधवा कडे मोबाईल आहे तर आपण आपल्या मोबाईल चा माध्यामातून दादर रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी पार्क परिसर, चैत्यभुमी परिसर मधील भिमबांधवा ची गर्दी व विविध पुस्तक स्टाॅल लाईव्ह व्हिडिओ काढा तसेच फोटो काढून व्हाटसअप व फेसबुक तसेच ईन्ट्राग्राम तसेच ट्विटर टाका.
◼विविध संस्था व मंडळ आणी पक्ष तसेच शासकिय योजना चे स्टाॅल तसेच भिमबांधवा ची लाखो ची गर्दी चे फेसबुक वर LIVE करा
◼ दादर व शिवाजी पार्क तसेच चैत्यभुमी परिसरात आसताना आपणास कचरा किंवा जेवणाची थाळी किंवा पाण्याची बाॅटल मिळाली तर कृपया आपला हाता नी उचलून कचरा डब्बात टाका
◼ मुंबई व ठाणे तसेच नवी मुंबई मधील भिमबांधवा नी आपला बरोबर पाण्याची बिस्लरी बाॅटल घेऊन जावे आणि शिवाजी पार्क वरील मंडप मध्ये आसणारा ग्रामीण भागातील भिमबांधवा ना पाण्याची बाॅटल द्यावी कारण त्यांना पाण्याची गरज आहे.
◼ मुंबई व ठाणे तसेच नवी मुंबई मधील भिमबांधवा नी बिस्किटे व फरसाण चे पाकिट घेऊन यावे आणि ग्रामीण भागातील चैत्यभुमी कडे आलेला भिमबांधवा बरोबर आलेला लहान मुलांना बिस्कीटे व फरसाण द्यावे
◼ बाईक व वाहन गाडी घेऊन येत आसल तर कर्कश आवाज न करता तसेच वाहतुकीचे नियम पाळून यावे त्यामुळे व्यवस्थित होईल .
◼️ मुंबई व ठाणे, कल्याण कर्जत,पालघर,कसारा, नवी मुंबई येथून चैत्यभूमी दादर येथे लोकल रेल्वे ने येणाऱ्या भिमबांधवांना विनंती रेल्वे डब्यात व्यवस्थित बसा तसेच उभे राहावे.ईतर प्रवासाना मदत करा ..
रेल्वे चा दारात युवकांनी उभे राहताना काळजी घ्या ..
◼️ दादर टर्मिनस व रेल्वे स्टेशन वरून महाराष्ट्र मधून येणाऱ्या भिमबांधवांना रस्ता क्रॉस करताना मुंबई मधील भिमबांधवांनी सहकार्य करावे.
◼ ७ व ८ डिसेंबर रोजी भारत मधील विविध राज्य तसेच महाराष्ट्र मधील जिल्हा मधील भिमबांधव परत आपला घरी जाण्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादर टर्मिनस आणि टिळक नगर टर्मिनस आणि महालक्ष्मी टर्मिनस व बांद्रा टर्मिनस येथून रेल्वे गाडी आपला घरी परतात पण येथील रेल्वे टिसी व कर्मचारी व रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बल फार हिडीस पिडिस करतात तसेच मदत करत नाही.(अपवाद काही)
मुंबई व ठाणे आणि कल्याण परिसरातील आंबेडकरवादी संघटना यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण टर्मिनस वर थांबा करून परत जाणाऱ्या भिमबांधवांना सहकार्य करावे.
◾तरी मुंबई व ठाणे तसेच नवी मुंबई मधील भिमबांधव आपण नोकरी व व्यवसाय निमित्त येथे ७ डिसेंबर व ८ डिसेंबर ला गेले तर या टर्मिनस वरील भिमबांधवा ना फ्लॅटफाॅर्म वर जाऊन विचारपुस करून रेल्वे गाडी बाबत माहिती देऊन मदत करा
◼ नेहमी प्रमाणे शांततेत आपण येऊ या चैत्यभुमी ला .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत