भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपी, अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ७ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ होईल. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचं भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं. देशाच्या व्यापारात वृद्धी होत असून, चालू खात्याची तूट कमी होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
डिजिटल व्यवहारांमध्ये दर महिन्याला वाढ होत असून बेरोजगारीच्या आकडेवारीत घट होत आहे. ग्रामीण भागातल्या कुटुंबांचं उत्पन्न वाढलं आहे, त्यामुळे या भागातली मागणी वाढत आहे. तसंच देशात बेरोजगारी कमी होत असून,२ आणि ३ चाकी वाहनांची मागणी वाढत असल्याचं ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत