किसिंजर अखेरपर्यंत सक्रिय होते. व्हाइट हाऊसमधील बैठकांना उपस्थिती, नेतृत्वशैलीवरील पुस्तकाचे प्रकाशन आणि उत्तर कोरियाकडून असलेल्या आण्विक धोक्याबद्दल सिनेटच्या समितीसमोर साक्ष देणे अशी अनेक कामे ते अखेरपर्यंत करत होते. जुलै २०२३ मध्ये त्यांनी अचानक चीनचा दौरा करून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शांतता नोबेल पुरस्कारप्राप्त हेन्री किसिंजर यांचे बुधवारी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते.
रिपब्लिकन पक्षाच्या रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी आपली छाप सोडली, ती त्यांच्या निवृत्तीनंतरही अनेक वर्षे टिकून राहिली. त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे त्यांची प्रशंसाही झाली होती आणि ते टीकेचेही धनी ठरले होते.
‘किसिंजर असोसिएट्स इन्क’ या भू-राजकीय सल्लागार संस्थेने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार, किसिंजर यांनी कनेक्टिकट येथील त्यांच्या घरात अखेरचा श्वास घेतला. मात्र, कोणत्या परिस्थितीत त्यांचे निधन झाले याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यांच्यावर खासगी कुटुंब सेवा केंद्रात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यानंतर न्यू यॉर्क शहरात त्यांच्या स्मरणार्थ जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत