अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रधवज वाटून तीन दिवस घरांवर लावायला सांगितले.

अमृत महोत्सवी लोकसत्ताकदिन (प्रजासत्ताक दिनानिमित्त) काय वाटणार आहात? अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याखाते सिडको, नांदेड.
९५२७६७३१०९
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी राष्ट्रध्वज लावून साजरा केला, वास्तविक पाहता राष्ट्रध्वज लावून राष्ट्राचा विकास कसा होईल? अंतिम सामन्यात भारत जिंकावा म्हणून यज्ञ केले जातात तो देश महासत्ता कसा होईल?
येत्या २६ जानेवारी पासून लोकसत्ताकदिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, यावेळी या दिनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे, नेहमी प्रमाणे राष्ट्रध्वज लावणे, देशभक्ती पर गीत लावणे हेच करणार आहे काय?
आमच्या मतानुसार अमृत महोत्सवी लोकसत्ताकदिन (प्रजासत्ताक दिनानिमित्त) संविधान उद्देशिका, मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये यांचे घरोघरी केंद्र सरकारने, राज्य सरकारने, जिल्हा प्रशासनाने केले पाहिजेत. संविधान निर्मितीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्याख्याने, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत,या ७५ वर्षात संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली आहे काय?.
वास्तविक पाहता संविधान बदल करायला निघालेल्या सरकारकडून या अपेक्षा ठेवणे म्हणजे हास्यास्पद ठरेल, कारण आज केंद्र सरकारची प्रत्येक कृती लोकशाही विरोधी असून हुकूमशाही मार्गाने जाताना दिसून येत आहे, निवडणूक आयोगाला सत्ताधारी पक्षाच्या अधिकारात आणणं, स्वतंत्र अभिव्यक्तीचा, बोलण्याचा अधिकार असून जवळपास १५० खासदारांना निलंबित करुन मनमानी कायदे पास करून घेत आहेत,हे कोणत्या लोकशाहीत बसतं? सरकारने कमरेखालच सोडून डोक्याला बांधलं आहे,अशा सरकार कडून लोकसत्ताकदिना निमित्ताने काय अपेक्षा ठेवायच्या?
जराशी लज्जा,शरम सरकार मध्ये बाकी असेल संविधान विरोधी कृती करणार नाही. नेहमी प्रमाणे राष्ट्रध्वज लावणे, मानवंदना देणे, देशभक्तीपर गीत लावणे हेच जर करायचे असेल तर असा लोकसत्ताक दिन आम्हाला नको आहे.
प्रिय मित्रहो,हे संबोधन आता कानाला नकोसं वाटत आहे म्हणून प्रिय लोकहो आता रात्र आणि दिवस वैराचा आहे म्हणून आपले रक्षण आपल्यालाच करावयाचे आहे, म्हणून येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर होण्यासाठी आप आपल्या परीने जनजागृती करायची आहे, निवडणूक आयोग केंद्र सरकारचं बटिक झाले आहे, विरोधी पक्ष निस्तेज झाले आहेत, म्हणून जनतेने शेवटचे हत्यार म्हणून जोपर्यंत ईव्हीएम मशिन बंद करून बॅलेट पेपर वर निवडणूका घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व निवडणुका वर बहिष्कार टाकणार आहोत असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले पाहिजे. सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा हीच भूमिका घेतली पाहिजे.
भारतीय लोकसत्ताकदिना निमित्ताने सरकार काही करत नसेल तर संविधान प्रचारक, अनुयायी यांनी आप आपल्या परीने उद्देशिकाचे आपल्या गल्लीत वाटप केले पाहिजेत, मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य यावर प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत,तरच खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी लोकसत्ताकदिन (प्रजासत्ताक दिन) साजरा होईल असे आम्हाला वाटते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत