प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीवर शरद पवार यांचं भाष्य; म्हणाले…

प्रकाश आंबडेकरांची कालची भेट ही महाविकास आघाडीत समावेशाबाबत नव्हती. मात्र त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्याबाबतीत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी काल प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या बैठकीवर भाष्य केलंय. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. जेव्हा आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात होते. त्या ग्रंथाला 100 वर्षे झाली. म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी बोलणार होतो. प्रकाश आंबेडकरही त्या कार्यक्रमात होते. तिथं त्याविषयीच फक्त बोलणं झालं. राजकारणावर आम्ही बोललो नाही, असं शरद पवार म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीच्या जागेवर दावा केला आहे. बारामतीची लोकसभेची जागा महायुतीच जिंकेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. त्यावरून शरद पवारांनी बावनकुळे यांना फटकारलं आहे. बातमी जर वृत्तपत्रात यायची असेल तर बारामतीचं नाव घेतलं जातं. मागच्या निवडणुकीत त्यांच्या त्यांना पक्षाने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. ज्यांच्या स्वत:च्या पक्षालाही ते तिकीट देण्याच्या लायक वाटत नाहीत, या व्यक्तीवर आपण काय भाष्य करायचं?, असं म्हणत शरद पवारांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.
पाच राज्यामध्ये निवडणुका होत आहेत. तिथं लोकं भाजपला बाजूला करतील. भाजपच्या विरोधात लोकांना कौल दिसतोय, असं म्हणत शरद पवार यांनी पाच राज्यातील विधासभा निवडणुकीवर भाष्य केलं. आमदार वाढीसंदर्भात आताच निर्णय होईल. असं मला वाटत नाही. आमदारांची संख्या वाढण्याच्या निर्णयाला 2029 उजाडणार, असं वाटतंय. त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत