दिनविशेष – गुरुवार दिनांक 16 मे 2024

आज दि. १६ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, गुरूवारो, वेसाख मासो, गुरूवार, वैशाख माहे.
१६ मे १९३८ – रोजी चिपळूण मुक्कामी ‘खोतांच्या जुलूम’ विषयी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जीवनात सर्वोच्च स्थानप्राप्तीची महत्त्वाकांक्षा जोपासा.”
१६ मे १९४३ – रोजी इंडीयन फेडरेशन ऑफ लेबरपुढे झालेल्या भाषणात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, “नुसते स्वराज्य मिळून फायदा नाही, ते कोणाच्या हातात राहणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.”
१६ मे १९४६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषद व हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापनेची घोषणा केली.
१६ मे १९५४ – रोजी रंगुन, ब्रह्मदेश येथे भरणाऱ्या जागतिक बौद्ध परिषदेसाठी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानाने पोहोचले. रंगुनमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत