
कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी पत्रकारांना दिली. दुसरा सर्वोत्तम पर्याय उभे खोदकाम करणे हा असून रविवारी दुपारी त्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे ८६ मीटरपर्यंत उभे खोदकाम केल्यानंतर, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याचा वरचा थर तोडावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
मजुरांच्या सुटकेसाठी सहा योजना अमलात आणण्यात येत आहेत, मात्र जमिनीला समांतर खोदकाम हा आतापर्यंतचा सर्वांत चांगला पर्याय आहे. त्यानुसार ४७ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे, असेही हसनैन यांनी सांगितले. दरम्यान, ऑगर यंत्राचे तुटलेले भाग ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे कामही सुरू असून, त्यासाठी मॅग्ना आणि प्लाझ्मा कटरचा वापर करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत