सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकन्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे मत

सर्वोच्च न्यायालयाने ‘लोक न्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. नागरिकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास घाबरू नये किंवा अखेरचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये,’’ असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले. संविधानदिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना, विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती या सोहळ्यास उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाल्या, की या विविधीकरण प्रक्रिया गतिमान करण्याचा एक मार्ग म्हणजे विविध पार्श्वभूमी लाभलेल्या न्यायाधीशांची गुणवत्तेवर आधारित, स्पर्धात्मक आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्तीसाठी एक प्रणाली निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी अखिल भारतीय न्यायिक सेवा तयार करणे हा एक चांगला पर्याय आहे. याद्वारे न्यायिक सेवांसाठी प्रतिभावान तरुणांची निवड करून, त्यांना संधी देता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत