आज गोकुळ दूध संघाची बैठक.

आज गोकुळ दूध संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी १ वाजता होणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे आजची गोकुळची वार्षिक सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे असतील.
तीन वर्षांपूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर विरोधक महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने गोकुळचे लेखापरीक्षण करण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला. यासह अन्य मुद्द्यांवरून गोकुळ संचालिका शौमिका महाडिक वारंवार आवाज उठवत आहेत. गोकुळमध्ये गैरकारभार होत असल्याचे आरोपही महाडिक यांनी केला. यावरून गोकुळच्या सभेत आज जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूध संघावर माजी मंत्री सतेज पाटील आणि विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे. विरोधी गटात माजी आमदार महादेवराव महाडिक गट आहे. पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दूध संघाचा दबदबा आहे. पश्चिम महाराष्ट्रासह महानगर मुंबईलागोकुळकडून दुधाचा मोठा पुरवठा होतो.
दररोज सुमारे ८ लाख लिटर दुधाची उलाढाल होते. आमदारकी नको पण गोकुळ दूध संघाचा संचालक करा, अशी कोल्हापुरात म्हण प्रचलित आहे. यावरुन गोकुळवर सत्ता किती महत्त्वाची आहे हे कळेल.
आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दूध संकलनामध्ये झालेली घट, दूध संघातील गैरकारभार याविषयी प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारु शकतात. मागील सभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का नाही झाली? याचा देखील जाब विचारला जाऊ शकतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत