मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

एकमेकाचे मतभेद विसरून नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासह नळदुर्ग तालुक्याच्या निर्मितीसाठी मधुकरराव चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा

आम्ही निःसंकोचपणे खंबीर साथ देऊ राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांचे प्रतिपादन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग या ऐतिहासिक शहराचा काया करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नळदुर्ग शहर तालुका निर्मितीसाठी पुढचे पाऊल टाकावे यासाठी आपण सदैव मधुकरराव चव्हाण यांच्या सोबत राहुन काम करू आणी खंबीर साथ देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्य कारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले
नळदुर्ग शहराच्या प्रलंबित प्रश्नावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली यामध्ये नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे या शहरांमध्ये शहर विकास आराखडा संदर्भात एकमत करून नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि या शहरातले सर्व प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे या विषयाला अनुसरून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पुढे यावे मी त्यांच्यासोबत खंबीरपणे साथ देऊ असे प्रतिपादन नळदुर्ग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले .
नळदुर्ग शहरातील महत्त्वाचे प्रश्न अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असून आज तागायत हे प्रश्न सुटलेले नाहीत शहराचा विकास होऊ शकला नाही आज नळदुर्ग शहरात रोजगाराचे साधन नसल्याने शहरांमध्ये युवकांचे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आज पर्यंत एकाही प्रतिनिधीने या बेरोजगारीचा प्रश्न सोडवलेला नाही .
ज्यांनी २५ वर्षे सत्तेत घालवले त्यांनीही युवकांच्या उपजीविकेचे प्रश्न प्रलंबित ठेवले आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले नसल्याचे दिसून आले नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून चांगलीच ओळख आहे या शहरांमध्ये ऐतिहासिक दर्जा असल्यामुळे या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंध्र प्रदेश कर्नाटकातून पर्यटक या ठिकाणी किल्ला पाहण्यासाठी येतात जवळपास ३० हजार च्या आसपास लोकसंख्या असलेले नळदुर्ग शहर शहरांमध्ये उद्योग धंद्यासाठी कोणी प्रयत्न करत नाहीत आणि केला तर ते चालू होत नाहीत ही शोकांतिका आहे या प्रश्ना सोबतच अनेक प्रश्न उप जीविकेचे आहेत जेणेकरून शेतकरी शेतकरी पीडित कष्टकरी या नागरिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून नळदुर्ग शहरात आपल अप्पर तहसील कार्यालयाची गरज असल्याचे मत अशोक जगदाळे यांनी सांगितले .
नळदुर्ग शहरासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करणे प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र भेडसावत आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे शासन दरबारी आपले प्रश्न मांडून या प्रश्नाचे निवारण करणे आजच्या काळाची गरज आहे कारण उद्योगधंदे नळदुर्ग शहरात परिसरात चालू झाले तर नळदुर्ग शहरातली बेकारी दूर होईल आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आसे ही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहराचा दर्जा महाराष्ट्रात खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने या शहराला मात्र वेगळेपणा दिला या शहरांमध्ये अनेक गोष्टी घडून येतात शहर विकास आराखड्यामध्ये नळदृग शहर पूर्ण विकास मय होत आहे
नळदुर्ग शहर तालुका निर्मितीच्या संदर्भातला नळदुर्ग शहर तालुका व्हावा हा नळदुर्ग करांच्या जिवाळ्यातला प्रश्न आहे . जिल्ह्यातल्या किती प्रतिनिधींना वाटतं हे नळदुर्ग शहर तालुका व्हावा या शहराला ऐतिहासिक दर्जा आहे या शहराच्या आसपास खेडेगावातील १०० वाड्या वस्त्या सह खेडेगावात नागरिकांचे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दळणवळण चालत आसते मग या शहराला तालुक्याचा दर्जा का मिळू नये आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन मतभेद विसरून तालुका निर्मितीसाठी का प्रयत्न करू नये , हे बाब कुठेतरी थांबली पाहिजे तालुका निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे या तालुका निर्मीतीसाठी अनेक आंदोलने झाली , उपोषण झाली , जेलभरो आंदोलने झाली , तरीही या तालुक्याच्या संदर्भात कोणीही लक्ष देऊन तालुका निर्मिती साठी प्रमाणिक प्रयत्न केलेला नाही कधी जाग येणार या सरकारला कधी जाग येणार या लोक प्रतिनिधींना , कधी जाग येणार या धाराशिव जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना , कधी जाग येणार मी नेते म्हणणाऱ्या नेत्यांना , कधी जाग येणार या प्रशासनाला की जेणेकरून नळदुर्ग शहराचा कायापालट होईल आणि नळदुर्ग
शहर तालुका निर्मित होईल आणि सर्व सुख सुविधा १०० गावच्या नागरिकांना मिळतील कधी होणार तालुका निर्मित नळदुर्ग शहर खूप मोठे बॅरेजचे काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जाते .
सुसज्ज असलेले नळदुर्ग शहर जर खरंच नळदुर्ग शहर तालुका निर्मिती करायचा असेल तर सर्व प्रतिनिधींनी , गावकऱ्यांनी उठाव गेला पाहिजे आणि तालुका निर्मिती प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे नळदुर्ग तालुका निर्मिती झाला तर अनेकांचे प्रश्न मार्गी लागतील यासाठी तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग शहर तालुका निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा समोर यावं सर्वाला एकत्र करावं नळदुर्ग शहर तालुका निर्मिती साठी नेतृत्व कराव मी कार्यकर्त्याना सोबत घेऊन मी तालुका निर्मीतीसाठी सोबत येईन सर्वानी तालुक्यासाठी प्रयत्न करावा मी अशोक जगदाळे मधुकरराव चव्हाणांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करेल मी सदैव त्यांच्या सोबत राहुन आनेक प्रश्न मार्गी लावु असे प्रतिपादन अशोक जगदाळे यांनी केले आहे
नळदुर्ग शहर तालुका निर्मिती साठी मधुकरराव चव्हाण यांनी प्रयत्न करावा नेतृत्व करावे आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मत या ठिकाणी अशोक जगदाळे यांनी व्यक्त केले आहे मी नळदुर्ग शहर तालुका निर्मितीसाठी एक पाऊल पाठीमागे घेतो आणि आपण एकत्र येऊन नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी प्रयत्न करूया जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी येतील त्या त्या वेळेचा विषय असेल परंतु आजचा खूप मोठा विषय आहे आणि प्रलंबित आहे हे प्रलंबित प्रश्न म्हणजेच नळदुर्ग तालुका निर्मित करावयाचा आहे यासाठी आपण एकत्र येऊया आणि पुढचे पाऊल टाकूया असे मत अशोक चौधरी यांनी व्यक्त केले आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!