माघ पौर्णिमा व संत शिरोमणी गुरु रविदास जी यांची जयंती आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे उत्साहात साजरी..


धाराशिव : 24.2.2024 संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज यांच्या जयंती निमित्त आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे विशेष वंदना व मनोगताचा कार्यक्रम पार पडला. तसेच सर्वांनी एकत्र येऊन माघ पौर्णिमा साजरी केली.
आयु. संभव पगारे यांनी संत गाडगे महाराज यांना आपल्या भाषणातून अभिवादन केले.
माघ पौर्णिमेचे धम्मातील महत्त्व सांगताना सुमित्रा ताई माने, विश्वास भाऊ पांडागळे व राजश्री ताई कदम यांनी तथागतांची महापरिनिर्वाण घोषणा, भंते आनंद यांचे महापरिनिर्वाण, वैशाली सारनाथ कुशिनगर या बौद्ध स्थळांची माहिती दिली.
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना जयंती दिनी अभिवादन करताना वंचितचे मिलिंद दादा रोकडे, प्रा. डॉ शिवाजी जेटीथोर यांनी अत्यंत कर्मठ समाजव्यवस्थेत संत रविदास महाराज यांचे दोहे समाज प्रबोधन, अंधश्रध्दा निर्मुलन व जाती भेद मुक्त समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी किती मोलाचे होते हे सांगितले.
डॉ. बाबासाहेबांनी आपला ग्रंथ त्यांना समर्पित केला होता, शिखांचा पवित्र ग्रंथ ” गुरु ग्रंथ साहिब” यात 40 दो हे समाविष्ट असणे, संत मिराबाई त्यांना गुरु मानत होत्या इत्यादी वरून संत रविदास महाराज यांची महती लक्षात येते.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे, तालुका महिला उपाध्यक्ष लक्ष्मीताई कदम, तुळजापूर शहर अध्यक्ष अप्सराताई कदम, सरचिटणीस सुमित्रा ताई माने, वंचित बहुजन आघाडी चे मिलिंद दादा रोकडे, दिशा समाज विकास संस्थेचे बाबासाहेब वढवे, प्रा डॉ शिवाजी जेटीथोर, आयु. धाकतोडे सर, नानाजी बनसोडे, करडखेले सर, ज्येष्ठ उपासिका सुमनताई रोकडे, सत्यशीलाआक्का कदम, स्वाती ताई सोनवणे, पंचशीला ताई कदम, कोमल केतन कदम, रमा चेतन कदम, माधुरी ताई नागटिळक यांच्यासह उपासक उपा सीका व बालक बालिका यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. देविदास विक्रांत कदम यांनी तर आभारप्रदर्शन आयु. लक्ष्मीताई महेश कदम यांनी केले.
सरणतेय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत