
कतारमध्ये ज्या माजी भारतीय अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्यातले काही अधिकारी असे आहेत ज्यांनी भारतीय युद्धनौकांचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिस या कंपनीसाठी काम करत होते. ही कंपनी कतारमधल्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. या आठ जणांवर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता त्यांना वाचवण्याठी भारताने पावलं उचलल्याचं कळतं आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. अशात आता भारत सरकारने त्यांच्या बचावासाठी कतार न्यायालयात दाद मागितली आहे. भारताने नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना जी फाशीची शिक्षा सुनावली त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे अपील दाखल केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत