केंद्रसरकारने खुल्या बाजारात केलेल्या लिलावात दोन लाख ८५ हजार टन गहू आणि पाच हजार टनापेक्षा जास्त तांदळाची विक्री

देशात गहू, गव्हाचं पीठ आणि तांदूळ यांच्या किमती नियंत्रणात रहाव्या याकरता केंद्रसरकारने साप्ताहिक ई लिलाव आयोजित केले आहेत. केंद्रसरकारने खुल्या बाजारात केलेल्या लिलावात दोन लाख ८५ हजार टन गहू आणि पाच हजार टनापेक्षा जास्त तांदळाची विक्री झाली आहे. याखेरीज केंद्रीय भांडार आणि नाफेड सारख्या निमसरकारी संस्थांना गव्हाचा अतिरिक्त अडीच लाख टनांचा साठा ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिला आहे. हा गहू दळून त्याचं पीठ या संस्था भारत आटा या नावाने त्याची विक्री साडेसत्तावीस रुपये किलो दराने करणार आहेत. या लिलावापासून घाऊक व्यापाऱ्यांना दूर ठेवण्यात आलं असून साठेबाजी रोखण्यासाठी देशभरात सुमारे अठराशे छापे टाकण्यात आल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत