डॉ .आंबेडकर विधी महाविद्यालयात अंनिस चा राज्यव्यापी कार्यक्रम संपन्न

डॉ .आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा मुंबई येथे अंनिस महाराष्ट्र द्वारे आयोजित जादूटोणा वअघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 बाबत जनजागृती आणि विधी महाविद्यालयातीलविद्यार्थ्यांना या कायद्यातील तरतुदींची माहिती व्हावी यासाठीकार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते. कार्यक्रमाची माहिती देताना दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.यशोधरा वराळे मॅडम उपस्थित होत्या देवदासी प्रथेविरुद्ध लढाऊ वृत्तीनेकार्य करणाऱ्या रणरागिनी नंदिनी जाधव यांनी या कायद्यातील विविध तरतुदी आणि कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रो. सुभाष चंद्र ,अंधश्रद्धा निर्मूलनवार्ता पत्राचे संपादक राजीव देशपांडे,अंनिस कार्यकर्ते भगवान रणदिवे, रमेश साळुंके,अनंत पवार , बेडेकर सर, पगारे सरआणि बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन पवार ,संजय गमरे ,जयेश सातपुते तसेच वडेराव इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणिआभार प्रदर्शन मधुकर वारभुवन यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



