
दिवाळीच्या तोंडावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या भावात तेजी आल्याचे दिसून आले. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन’च्या (आयबीजेए) वेबसाइटनुसारदिवाळीच्या तोंडावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या भावात तेजी आल्याचे दिसून आले. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन’च्या (आयबीजेए) वेबसाइटनुसार, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे भाव ५११ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमसाठी ६१,३३६ रुपयांवर गेले. त्याच वेळी १८ कॅरेट सोन्याचा भाव ४६,००२ रुपयांवर गेला., सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे भाव ५११ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमसाठी ६१,३३६ रुपयांवर गेले. त्याच वेळी १८ कॅरेट सोन्याचा भाव ४६,००२ रुपयांवर गेला.
चांदीचे भावही ८२७ रुपयांनी वाढून प्रतिकिलोसाठी ७१,७३३ रुपयांवर गेला. तत्पूर्वी हा भाव ७०,९०६ रुपयांवर होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात सोन्या-चांदीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोन्या-चांदीच्या भावात चालू महिन्यात दमदार वाढ झाली आहे. या महिन्यात सोन्याच्या भावात ३६१७ रुपयांची वाढ नोंदवली गेली. एक ऑक्टोबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ५७,७१९ रुपये होता. त्याचवेळी चांदी एक ऑक्टोबरच्या प्रतिकिलो ७१,६०३ रुपयांवरून ७१,७३३ रुपयांवर पोहोचली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत