निवडणूक आयोग व केंद्र सरकार जुमानत नाही आणि सुप्रीम कोर्ट याचिका फेटाळतंय याला जनता जबाबदार –

प्रा. देविदास इंगळे
भारतीय जनतेनी मुघलांची, निझामांची, आदिलशहा यांची गुलामी केली आणि इंग्रजांची गुलामी केली त्याचबरोबर मनुवाद्यांची गुलामी केली ही नाडी मनुवाद्यांनी ओळखली आणि तोच पाढा मनुवादयांनी चालू ठेवलाय.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिल्यानंतर फार आनंदित झाले की तळागाळातील जनतेला मी राजा निवडण्याचा अधिकार दिलो परंतु त्यांचेसोबत असणारा खासदार बाबासाहेबांना म्हणाला एवढं खुश होण्याची गरज नाही कारण आम्ही पैशावर तुमच्या लोकांना विकत घेवू आणि कोणाला सत्येवर बसवायचं हे आम्ही ठरवू हे आज सार्थ होतांना दिसतंय.
जनता विकल्या जातेय आज आपणास मटण, दारू, पैसा प्यारा वाटतोय प्रत्येक जन चर्चा करतोय तुमच्याकडे मतदानाचा काय धारा होता ईव्हण कर्मचारी सुद्धा.
ही गोष्ट लाजिरवाणी, केविलवानी आणि निंदनीय आहे
आपण काय करीत आहोत याचे भान ठेवा विकल्या जावू नका ही
गुलामीचे द्योतक नव्हे तर काय होय.
मनुवाद्यांनी लोकांची कमजोरी ओळखली आणि त्यांनी सपाटा लावलाय आमदार खासदार यांना 150-200 कोटी दयावेत म्यॅनेज करून सत्ता स्थापन करावी.
ईव्हीएम मध्ये गडबडी करणे, निवडणूक म्यॅनेज करणे व राज्य स्थापन करणे असं चालू असतांना जनता मात्र चावडीवर गप्पा, मोबाईल वर गप्पा, संवादित गप्पा परंतु जनता रस्त्यावर यायला धजत नाही
म्हणून त्यांना बळ पोहचत आहे.
आंदोलने, मोर्चे, धरणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो लोकांनी वापरला पाहिजे आणि आपणास नको ती गोष्ट ह्दपार केली पाहिजे.
ईव्हीएम विरोधात आंदोलन कोणाचेही असो त्यात सामील व्हा आणि लोकशाही टिकवण्यास मदत करा.
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान स्थापित
सर्व पक्षीय सर्व संघटनीय समावेशक
ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जनआंदोलन कृती समिती तर्फे
10 डिसेंबर पासून साखळी बेमुदत उपोषण चालू करीत आहोत जास्तीत जास्त पक्ष, संघटना व जनतेनी सहभाग घ्यावा व गुलामी टाळावी.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत