EVM वरील असंतोष दाबण्यासाठी केलेले षडयंत्र लक्षात घ्या बहुजनांनो
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात फक्त महाराष्ट्रातच जनजागृती मोर्चे कसे निघाले? कारण महाराष्ट्रातील EVM विरोधातील असंतोष दुसरीकडे वळवायचा होता.
त्याच जनजागृती मोर्चात परभणीत संविधानाचा अपमान करून आंबेडकरांना मानणाऱ्यांना चिथावणी देऊन EVM विरोधातील लक्ष आणखी दुसरीकडे वळवायचे होते.ज्यामुळे सत्ताधारी आणखी सुरक्षित होतील.
आणि संसदेत पुन्हा आंबेडकर…. आंबेडकर….करुन संपूर्ण देशाचं लक्ष EVM वरील असंतोषावरून दुसरीकडे केंद्रित करायचे.असा हा दिर्घकालीन प्लान होता.
EVM ने आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरीकाला दिलेला मताचा अधिकार संपवला आहे.तूम्ही मते तर द्याल पण त्या मतांची काऊंटीग EVM त्यांच्या सोईसाठी करणार आहे.
तूम्ही न्यायालयात EVM विरोधात दाद मागितली तर नायालये सुद्धा तुमच्या याचिका फेटाळून लावत आहेत. कारण तिथे सुद्धा कोण बसले आहे ते लक्षात घ्या.
जगात ज्या जर्मनीने EVM आणली त्या देशाने सुद्धा तिचा वापर बंद करुन बॅलेटपेपर वरच निवडणुका घेतल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, जपान हे अत्यंत प्रगत देश बॅलेट वरच निवडणुका घेत आहेत. अलीकडेच बांगलादेशातील जो मोठा उठाव झाला, तो सुद्धा EVM बंद करण्यासाठी होता हे लक्षात घ्या.
इलेक्शन प्रोसेस महिनाभर चालली तरी ती येणाऱ्या 5 वर्षासाठी असते म्हणुन महत्त्वाची असते.
लोकशाहीत मजबूत नव्हे तर मजबूर सरकार पाहिजे असते. ज्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष लोकहिताचे कायदे सरकारला करायला भाग पाडेल. इथे तर विरोधी पक्षच संपवले जात आहेत.
म्हणून बहुजनांनी लक्षात घ्यावे की सध्या ज्या घटना घडत आहेत,त्या EVM विरोधातला असंतोष डायव्हर्ट करण्यासाठी आहेत.पण तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ईव्हीएम विरोधाचा मुद्दा पाठी पडु देऊ नका..
कारण आताचे निवडुन आणलेले केंद्र व राज्य सरकारे हे ईव्हीएम घोटाळे करुन बनवलेले सरकार आहेत..म्हणुन ते सतत अघोरी निर्णय घेतात.आशा या ईव्हीएम घोटाळेबाज सरकारचा व ईव्हीएमचा विरोध कायम निरतर गावो गावी सुरुच ठेवा..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत