महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

चंद्रकांत पाटलानंतर आता तुमचा नंबर, लवकरच शाईफेक करू; भीम आर्मीचा शिंदे-फडणवीसांना इशारा.

सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर भीम आर्मीचे अध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांने रविवारी शाई फेकली. याप्रकरणी पोलिसांनी अजय मैंदर्गीकरला ताब्यात घेतलं. त्यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला असून शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. अजय मैंदर्गीकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा येत्या काळात खाजगीकरणाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाईफेक करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर पोलिसांनी अजय महिंद्रकरला बेदम मारहाण केली, चंद्रकांत पाटील यांच्यापासून अजय मैंदर्गीकरच्या जीवाला धोका आहे, असा आरोपही अशोक कांबळे यांनी केला आहे. इतकंच नाही, तर कंत्राटी भरतीचा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा चंद्रकांत पाटलानंतर तुमच्यावरही शाईफेक करु, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस यांना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

पालकमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात आले होते. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी करत आंदोलन केलं. इतकंच नाही, तर त्यांनी चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे देखील दाखवले. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने अजय मैंदर्गीकरला ताब्यात घेतलं. रात्री उशिरा पोलिसांनी मैंदर्गीकरच्या विरोधात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अजय मैंदर्गीकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अजय मैंदर्गीकर यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा येत्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर शाईफेक करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!