बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेता प्रबुद्धपाल बनसोडे व महेश गायकवाड यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विघापीठ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेजच्या यशात अनखीन एक रोवला मानाचा तुरा
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठा अंतर्गत घेण्यात आलेल्या
महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा २०२५ ही स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठा अंतर्गत भरवली गेली होती . छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेजला शिक्षण घेत आसलेल्या सुवर्णपदक विजेता प्रबुद्धपाल दादासाहेब बनसोडे व महेश मल्हारी गायकवाड
हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेज मार्फत झालेली बॉक्सिंग स्पर्धा बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर येथे संपन्न करण्यात आली या तिन मोठ्या राऊंड मध्ये प्रबुध्दपाल दादासाहेब
बनसोडे व महेश मल्हारी गायकवाड
दोघांनी समोरच्या स्पर्धकावर मात करून महाविद्यालयीन स्पर्धे मध्ये
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेजच्या यशात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे . यावेळी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे संस्थापक मनोहर पंथ सपाटे , प्राचार्य मित्रगोत्री , शारीरीक शिक्षण संचालक संतोष गवळी , बॉक्सिंग कोच प्रा सोहेल पठाण आदींनी सत्कार व गौरव केला .
या यशा मुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत