
केंद्र सरकारचे शेतीबाबत ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांच्या मालाची माती होत आहे. कांद्याचा भावाअभावी नेहमीच वांधा होत चालला आहे. कांदा हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. पाहिजे तेव्हा कांद्याचे भाव पाडून, निर्यातशुल्क वाढवून, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम संबंधित यंत्रणा करीत आहे.
आताही निर्यातशुल्क प्रचंड वाढवून कांद्याचा वांधा झाला आहे. अधिक भाव मिळेल या अपेक्षेने उन्हाळ्यापासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला आहे. उकिरड्यावर फेकला जात आहे. आता तरी सरकार धोरण बदलेल का, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने कांद्याचे भाव वाढू लागल्याने ४० टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. यामुळे परदेशात होणारी निर्यात जवळजवळ थांबालीच आहे. या निर्यातशुल्कामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत