
” अवकाळी पाऊस. “
होता आधीच, शेतकरी बेजार,
त्यात माजवला,
अवकाळीने हाहाकार,
पिकं कष्टाने, उभी केलेली,
झाली मातीमोल, येता पूर सर्वदूर.!
होता आधीच, शेतकरी बेजार,
पावसाच्या लहरीपणाने,
ओल्या, सुक्या दुष्काळाने,
मुला, बाळाच्या उपासमारीने,
त्यांच्या भवितव्याच्या चिंतेने.!
होता आधीच, शेतकरी बेजार,
भांबावलेला, कातवलेला,
दिवसागणिक वाढत जाणार्या,
सरकारी अन सावकारी,
कर्जाच्या बोजाला.!
आता तर तो,
जास्तच झालाय बेजार,
पुढाऱ्यांच्या दौऱ्यांने,
श्रेयवादाच्या लढाईने,
नुकसान भरपाईच्या चकव्याने,
अन भविष्याच्या,
काळ्याकुट्ट अंधाराने.!
अन भविष्याच्या,
काळ्याकुट्ट अंधाराने.!!
अन भविष्याच्या,
काळ्याकुट्ट अंधाराने.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…26/09/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत