देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महापुरुषांच्या विचारांचे वारसदार की पराभव करणारे नतद्रष्ठ


लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- १/९/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — ३४
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
मुंबई येथे दिनांक ७ डिसेंबर १९४० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भाषणात म्हणतात की; काही मंडळींनी उघडपणे कोकणस्थ व देशस्थ भेद माजविला आहे.या भेदभावाने समाजाचे कल्याण होणे तर दुरच राहिले पण नुकसान मात्र ताबडतोब झाल्याशिवाय राहणार नाही.हा भेदभाव उत्पन्न करणाऱ्या लोकांनी या दहा बारा वर्षात काही समाजहिताची कार्ये केली असती तर मला आनंद झाला असता.त्यांनी काही बोर्डींगे काढली असती.काही गरीब मुलांना स्कॉलरशिपा देवविल्या असत्या तरीही मला आनंद झाला असता.पण तसे काही एक नसून उलट समाजात भेदनीती निर्माण करण्यात येत आहे.कटू शब्द सांगणे मला प्राप्त होत आहे.येथे जमलेल्या मंडळींना मला एक शुभसंदेश सांगावासा वाटतो.आणि तो हा की; तुम्ही देशस्थ; कोकणस्थ; कर्नाटकी व वायदेशी असा भेदभाव कराल तर तुम्ही अधोगतीला गेल्यावाचून राहणार नाही.इतके दिवस आपली अधोगती झाली ती आता होता कामा नये.समाजात भेदभाव करणाऱ्यांना आपण बिलकुल थारा देऊ नका.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे बोल समाज संघटित रहावा या तळमळीतून दिला आहे.परंतू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात समाजाने हा संदेश गांभिर्याने घेतला काय? काही मुठभर लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या जीवनात अमलात आणत असतात.परंतू बराच मोठा समाज हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचाराला गांभीर्याने न घेता स्वार्थासाठी समाजाची समता व संघटन उध्वस्त करतांना दिसतील.अनेक गट तट काढून आपला स्वार्थ; पद ;प्रतिष्ठा; मीपणा; अहंकार या नकारात्मक मानसिक अवस्थेत जगत आहेत.ज्या बौद्ध धम्माने समता हे तत्व दिले त्या बौद्धांनी या तत्वाला हरताळ फासून नव नवीन गट संघटना काढून नवीन जातीव्यवस्था जोपासली. एक संघटना दुसऱ्या संघटनेला दुषणे देण्यात धन्यता मानते.एका बौद्ध संघटनेचे लोक दुसऱ्या बौद्ध संघटनेच्या कार्यक्रमाला जात नाहीत.जसे जातीव्यवस्था ही द्वेष व तिरस्कार या दूर्गुणांवर अवलंबून आहे.तसे हे वेग वेगळे गट एकमेकांचा द्वेष; तिरस्कार व बदनामी करण्यात आघाडीवर आहेत.म्हणजे वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बोल आजही खरे ठरत आहेत.बाबासाहेब म्हणतात की; भेदभाव कराल तर अधोगतीला जाल. आज समाजात समता व संघटितपणा नसल्याने समाज अधोगतीला चालला आहे असेच चित्र दिसेल.या बाबत समाज गंभीर नसल्याचे वातावरण अवतीभवती आपणास पहायला मिळेल. नेत्यांच्या अहंकारामुळे व नेतृत्वाच्या हव्यासापोटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हाल अपेष्टा सहन करून निर्माण केलेली पोलादी चळवळ या नतद्रष्ठ लोकांनी लयास नेली.फार तुरळक लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला जीवंत ठेवण्यासाठी धडपडत असतात.परंतू त्यांना प्रस्थापित मनुवादी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांचे गुलाम दलाल काम करू देत नाहीत अशी परिस्थिती आपणास पहावयास मिळते.
कुटुंबाची अवस्था सुद्धा अशाच प्रकारे सुरू असल्याचे आपणास दिसेल.भावा भावात समता नाही.बहीणी बहीणीमध्ये समता नाही. पती पत्नी मध्ये समता नाही.सासू सूनेमध्ये समता नाही.बाप लेकामध्ये समता नाही.यामुळे बऱ्याच कुटुंबात नात्या नात्यात दुरावा; कटुता असल्याचे आपणास दिसेल.जे समतेचे जवळचे शब्द आपुलकी; सहानुभूती ; माणुसकी हे शब्द आता गुळगुळीत होत चालले आहेत असे दिसेल.याचा अर्थ सरळ आहे.माणूस स्वार्थी;लोभी व अहंकारी झाल्याने नात्या – नात्यात तडा गेल्याचे आपणास दिसेल. जरी अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात असली तरी काही मोजकी कुटुंब समतेने; सामंजस्याने; सहानुभूतीने; सहकार्याने एकमेकांना मैत्रीने मदत करताना सुद्धा आपणास पहावयास मिळतात.

उर्वरित भाग पुढे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!