नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्यावर तहसिलदर प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण

हर घर तिरंगा म्हणत विद्यार्थी तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यासाठी ऐतिहासिक किल्ल्यात दाखल
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्यात नळदुर्ग येथील अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी नळदुर्ग शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार विद्यार्थी यांनी तिरंगा ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली शिवाय नळदुर्ग येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल , जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग , सय्यद अब्दुल्ला मेमोरियल उर्दू शाळा नळदुर्ग , अंजनी प्रशाला नळदुर्ग ,अध्यापक विद्यालय नळदुर्ग , जिल्हा परिषद प्राथमिक स्पेशल शाळा नळदुर्ग , धरित्री विद्यालय नळदुर्ग नॅशनल मराठी शाळा नळदुर्ग , व इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजास सलामी देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव व सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक ईश्वर नांगरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये तिरंगा ध्वजाला सन्मान पुर्वक मानवंदना दिली यावेळी नळदुर्ग येथील माजी नगराध्यक्ष शहबाज काझी भाजपाचे नेते सुशांत भुमकर , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , माजी नगरसेवक विनायक अहंकारी , माजी नगरसेवक बसवराज धरणे , माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , न प माजी उपाध्यक्ष शफीभाई शेख , इमाम शेख ,पत्रकार दादासाहेब बनसोडे , आयुब शेख , शिवसेनेचे संतोष पुदाले , वाहातुक निरीक्षक महेश डुकरे सामाजिक कार्यकर्ते बंडू कसेकर सामाजिक कार्यकर्ते दुधाजी वाघमारे , नळदुर्ग येथील नगर परिषदेचे कर्मचारी सह नळदुर्ग अप्पर तहसिल कार्यालयाचे अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड ,
मंडळ अधिकारी पवन भोकरे, डी.एम.कांबळे , ग्राम महसूल अधिकारी आर बी पाटील , एस ए कुलकर्णी , तलाठी आकांक्षा डी वाघमारे , गायकवाड
महसूल सेवक डी एल सर्जे , एस व्ही कोकरे , जे के जमादार ,महसूल सहाय्यक समाधान पोथरे
इतर एम आर फुलारी सह नागरीक पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत