अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातले प्रबळ व प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते : – आमदार प्रविण स्वामी

संत तुकाराम सामाजिक संस्था व संभव प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श समाज सेवा पुरस्काराचे वितरण
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दिन दलित यांच्या उत्थानासाठी कार्य केले अण्णाभाऊ साठे एक थोर विचारवंत होते लेखक समाज सुधारक होते त्यांनी मराठीतून लेखन करून लोक साहित्याचा प्रचार केला ३५ हुन अधिक कांदबऱ्या आणि १० नाटके लिहिली
फकिरा कांदबरीला तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला अण्णाभाऊ साठे हे कामगार चळवळीत सुद्धा सक्रीय होते . आपल्या शायीरीतून सयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम चळवळी मध्ये खुप मोठे योगदान आहे . लोककलावंत शाहीर पोवाडे आणि लावण्याचा वापर करून समाज प्रबोधनाचे कार्य केले
अण्णाभाऊ साठेनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आवाज उठविला अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक प्रेरणादायी व प्रबळ व्यक्तीमत्व होते आसे परखड मत उमरगा लोहाऱ्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा डॉ लक्ष्मणराव ढोबळे हे होते तर प्रमुख पाहुणे अणदूर गावचे सरपंच रामचंद्र दादा आलुरे माजी प्राचार्य संगमेश्वर जळकोटे इटकळ गावचे सरपंच साहेब क्षिरसागर आदिजन होते प्रथमता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले . आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल फेटा बुके देऊन दयानंद काळुंके , तुकाराम क्षिरसागर , प्रबोध कांबळे , मारुती बनसोडे , कपील क्षिरसागर यांनी स्वागत पर सत्कार केला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी केले तर सन्मान पत्राचे वाचन अणदूर गावचे माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी केले .
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्ताने संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगांव व संभव प्रतिष्ठान केशेगाव आयोजित जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान व ” साहित्य सुर्य ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .
यावेळी खालील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील मान्यवरांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नगीनाताई कांबळे [ काटगांव ] बजरंग ताटे [ मस्सा खु ] मीनाक्षीताई पेठे , [ सोलापूर ] .राजीव कसबे [ औसा ] ईश्वर शिरसागर [ केशेगाव ] डॉ किशोर जोगदंड [ सोलापूर ] पत्रकार रुपेश डोलारे [ सांगवी मार्डी ] पत्रकार अरुण लोखंडे [ जळकोट ] शिवाजी गायकवाड [ नळदुर्ग ] पत्रकार एस के गायकवाड [ वागदरी ] पत्रकार दादासाहेब बनसोडे [ नळदुर्ग ] लक्ष्मण क्षिरसागर [ केशेगाव ] विशोर जाधव [ सोलापूर ] अशोक जाधव [ काटी ] जोशीलाताई लोमटे [ तेर ] पांडुरंग घोडके [ धाराशिव ] सुनिताताई भोसले [ केरूर ] डॉ विलास साबळे [ बुलढाणा ] अहमद शेख [ नळदुर्ग ] किसन देडे [ काक्रंबा ] सुनीताताई भोसले [ अणदुर ] चंद्रकांत कांबळे [ अणदूर ] विकास कसबे [ धाराशिव ] बालाजी गायकवाड [ उमरगा ] भारत गायकवाड [ अणदूर ] अहमेद शेख [ नळदुर्ग ]
अदि मान्यवराना आदर्श समाज सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संतोष पवार यांनी केले तर शेवटी
आभार संभव प्रतिष्ठानचे तुकाराम क्षिरसागर यांनी मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत