देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पारदर्शीपण हरवलेल्या निवडणुका ,,,आणि निर्लज्ज सरकारे

ऍड अविनाश टी काले , अकलूज
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
पिन 413101
मो न 9960178213
~~~~~~~~~
भारतीय लोकशाही ही लोकप्रतिनिधित्वावर आधार भूत आहे , आणि लोकप्रतिनिधी निवडण्याचा मार्ग हा प्रौढ मतदान आहे ,
नागरिकांना भारतीय राज्य घटनेने “एक मत एक मूल्य ” हा राजकीय समतेचा अधिकार आहे ,
माझा लोकप्रतिनिधी कोण असावा ? मी स्वतः ? की अजून दुसरा कोणी? की या पैकी कोणी ही नाही म्हणून नोटा ,,, ,
निवडणुकीला उभे राहण्या पासून ते मतदान करण्या पर्यंत हे अधिकार आहेत ,
आपल्या विचाराचे सरकार अस्तित्वात यावे म्हणून मी माझ्या मतचा उपयोग करून पक्ष किंवा अपक्ष उमेदवार माझा प्रतिनिधी म्हणून निवडतो , तो बहुमताने निवडला जातो , आणि कोणतेही बहुमत सिद्ध करण्यासाठी निरपेक्ष मतदान पद्घती , त्यातील पारदर्शीता महत्वाची असते ,
आणि हे घडून यावे , शांततामय रित्या सरकारे बदलली जावीत किंवा तीच सरकारे असावीत हे ठरवण्यासाठी हे मतदान असते ,
ही प्रक्रिया निवडणूक आयोग नावाची संस्था “पक्ष निरपेक्ष” राहून करते ,
ह्या संस्थेने निर्भय वातावरण , मतदानातील गोपनीयता , राखून निवडणूक पार पाडणे आवश्यक असते ,
भारतात अशी प्रामाणिक माणसे भेटतच नाहीत , ती फार दुर्मिळ असतात ,
टी एन शेषन यांचा जो दबदबा साऱ्या राजकीय पक्षांना वाटत होता , तसा आत्ता कोणाचा वाटत नाही ,
जुन्या काळात हे मतदान मतपत्रिका आधारे घेतले जायचे ,, स्थानिक पुढारी बोगस मतदान करवून ही घ्यायचे असे कांहीं दोष त्यात होते , पण मतदान पद्धती अचूक होती , आणि त्यातील पारदर्शीता प्रखर होती ,,
अतिशय अटी टतीच्या लढतीत मोजण्यात कांहीं चूक झाली तर त्याची पुन्हा मतमोजणी घेतली जायची ,,
काळ बदलला आणि नव्या युगाची इलेक्ट्रॉनिक मशीन अस्तित्वात आली ,
ह्या मशीन काँग्रेस चे काळात आल्या , निवडणूक आयुक्त हे निवडणूक ऑफिसर म्हणून सर्वेसर्वा बनत आणि या निवडणुकीत कोणत्याच पक्षाचा हस्तक्षेप डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट नसायचा ,,
पण ज्यांना लोकशाही अमान्य आहे , आणि येन केन प्रकारेण आम्हीच सत्तेत असलो पाहिजे या भूमिकेतून यातील फटी शोधण्यास सुरुवात केली ,,
हजारो वर्ष ज्यांनी फक्त जनतेला भ्रमित करून फक्त सुख भोगले त्यांचे साठी लोकांना भ्रमित करणे फारसे अवघड कधीच नव्हते , आज ही नाही ,,
असा वर्ग सत्तेत आला , आणि या सत्तेने निवडणूक आयोगाला गिळंकृत केले ,,
त्यांचे सोयीने निर्णय घेण्यात येऊ लागले , प्रचाराची परवानगी कुणाला द्यायची ? याचे ही अग्रहक्क ठरू लागले , निवडणूक आयोग पक्षपाती रीतीने काम करतो असा आक्षेप लोक चर्चेत पुढे येऊ लागले ,,
अतिशय चमत्कारिक निर्णय या देशाने पाहिले , भाजपच्या विरोधात उभे राहिलेल्या पक्षाच्या मान्यता ही आणि चिन्हे ही त्यांच्या नावे करण्यात आली ज्यांच्या कर्तुत्वाने ते पक्ष उभे ही राहिलेले नव्हते ,
आपण मूळ मुद्द्या कडे आल्या नंतर असे दिसून येते की , भाजपा हा कायम सत्तेत रहावा म्हणून मताची चोरी केली जात होती ,,
काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाची यंत्रणा , मानवीय शक्ती असून ही त्यांना निवडणुकीचा डाटा मिळवता आला नाही ,,
ज्या बूथ वरील मतदान केंद्रावर असणाऱ्या मशीन वर संशय घेऊन त्याची पुनर्मोजणी करून त्याची खातर जमा करून घेण्या साठी व्हीव्ही पॅड मधील मतपत्रिका तपासाव्यात म्हणून मागणी केली तरी , असा एस ओ पी निवडणूक आयोगाचा नसल्या मुळे आम्ही ती माहिती देऊ शकत नाही असे जिल्हाधिकारी यांनी सांगणे यातच नक्कीच गोम असावी असे सामान्य मतदार म्हणून आम्हाला ही वाटते
अश्या शका सार्वत्रिक रित्या व्यक्त केल्या जात असताना च महाराष्ट्रात जनतेचे लक्ष वेधून घेतले ते वंचित चे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रकाश जी आंबेडकर यांनी ,,
त्यांनी जो आक्षेप घेतला तो मतदान प्रक्रिया संपल्या नंतर अचानक झालेल्या टक्के वारीतील वाढीव बदलाकडे,,,
आणि मतदानाची वेळ संपल्या नंतर त्या त्या बूथ केंद्रावरील सी सी टिव्ही फुटेज ची मागणी त्यांनी केली ,
अर्थात त्यांनी केलेली याचिका ही फेटाळली गेली ,, आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ही अनुत्तरित राहिली.
निवडणूक प्रक्रियेवर कुणी शंका व्यक्त केल्या रे केल्या की दिल्ली पासून गल्ली पर्यंत एका सुरात विरोध करणारी सत्ताधारी , आणि त्यांचे लाभार्थी पाठीराखे हे ठरलेले असायचे ,,
मग इकडच्या राज्यात असे घडले ,, तेंव्हा तुम्ही शंका घेतल्या नाहीत आणि आत्ता तुम्ही हरल्यावर निवडणूक यंत्रणेत दोष दिसतोय काय? असे म्हणून टिंगल टवाळी करून तो विषय अडगळीला टाकण्याचा नवा पायंडा पाडला गेला ,,
भाजपा प्रेमी जनतेसाठी निवडणूक आयोग ही त्यांची आवडती संस्था बनली होती ,,
काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते , श्री राहुल जी गांधी यांनी निवडणूक मतदार याद्यांच्या आधारे दर्शवून दिले की वाढीव मतदार हे वेगवेगळ्या मतदार संघात आणि राज्यात ही तेच ते आहेत , त्यांचे नाव त्यांचा पत्ता समान आहे ,,
याचा प्रत्ययवाद म्हणून असा युक्तीवाद पुढे आला की ,
प्रत्यक्ष मतदान होताना बूथ केंद्रावर सगळ्या पक्षाचे पोलिंग एजंट असतात , आणि ते सगळे त्याच भागातील असल्याने एकमेकाला ओळखतात ,, मग असा नवखा माणूस बूथ वर मतदानाला आल्या नंतर सापडला नसता काय?
वरकरणी पाहता हा युक्तीवाद पटण्या सारखा असतो ,,
त्याचे विश्लेषण करू शकू असा डाटा हाती नसलेले आपण सामान्य मतदार ,,!
फक्त अनुमान आणि तर्क बुध्दी वापरून हे कोडे आपणाला सोडवायचे आव्हान आपल्यापुढे असताना आपण कांहीं कारणे पाहू
1),,, इलेक्ट्रॉनिक कार्य पद्धत ही अत्यंत सुलभ आणि तत्काळ गणिताची आकडे मोड करणारे साधन असते
जसे की कॅलक्युलेटर वर आपण संख्या दाबली , हवी ती संख्या , हवा तो भागाकार , गुणाकार , बेरीज , वजाबाकी इतकेच काय वर्गमूळ ही एका क्षणात आपल्या समोर दृश्य पटलावर दिसते .
इतकी अचूक झटपट सुविधा उपलब्ध असताना ही निवडणुकांचे दीर्घ कालीन टप्पे कशासाठी?
याचे उत्तर शोधायला गेले तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी , पुरेशी यंत्रणा नसल्याने अशी उत्तरे येतात ,,
आणि अशी क्षमता नसताना “एक देश एक निवडणूक ” ही घोषणा का केली जाते? याची उत्तरे मिळत नाहीत ,, अश्या निवडणुका आणून समग्र देशात गल्ली ते दिल्ली एक छत्री , एक पक्षीय राजवट स्थापित करणे हे त्यांचे लक्ष होते व आहे ,
विरोधी पक्ष इतके कमजोर करायचे की त्यांचा आवाज संसदेत ही उठला नाही पाहिजे ,
आणि तसा तो उठलाच तर सभागृहाच्या आवारात त्यांचे समर्थक येऊन कशी हाणामारी करतात ते महाराष्ट्राच्या विधी मंडळात जनतेने पाहिलेले आहे ,
आणि हे घडवून आणण्यासाठी त्यांना त्यांचा असलेला मतदार जो त्या निवडणूक यंत्रात फिट आहे त्याला वापरायचे आहे ,
हे मतदार यादीत आलेले घुसखोर मतदार छुपे आहेत ,, ते रामायणातील “घटोतकच्छ” आहेत ,,
ते बूथ केंद्रातील कोणत्या ही सी सी टिव्ही ला दिसणार नाहीत , बूथ पोलिंग एजन्ट ला दिसणार नाहीत ,
मतदान झाल्या नंतर मतदान यंत्रे मतमोजणी केंद्रावर पोहचल्या नंतर कांहीं दिवसांनी यातील डाटा मिळवला जातो , आणि असा डाटा मिळाल्या नंतर आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी नीच्छित केलेली मते त्या उमेदवाराला दिली जातात ,
यातून ही कांहीं स्थानिक समझोता आणि घडामोडी घडल्या नंतर ही यंत्रणा जेंव्हा हार मानते तेंव्हाच त्यांचा उमेदवार पराभूत होतो .
अन्यथा नाही
मी ज्या भागात राहतो त्या भागातील विधानसभेच्या मतदानाचे निकाल ,त्याची आकडेवारी , उमेदवारांना पडलेली मते , तेथे अस्तित्वात असलेले राजकीय गट , याचा माझा अभ्यास असतो तसाच अभ्यास राजकीय पक्ष ही करत असतात आणि निवडणूक रणनीती आखत असतात ,
करमाळा विधानसभा मतदार संघातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी नारायण आबा पाटील यांचा थोड्या मताने पराभव केला होता , तेंव्हा तिरंगी लढत होती ,
या 2024 चे निवडणुकीत करमाळा येथील जयवंत राव जगताप यांचा गट मोहिते पाटील यांनी जोडून घेतला आणि राजकीय समीकरणे बदलून नारायण आबा पाटील निवडून आले ,
अशीच बाब सांगोला मतदार संघात झाली , 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चां राजीनामा देऊन सोलापूर जिल्हाध्यक्ष असलेले आ दीपक आबा साळुंखे यांनी शिवसेना उमेदवार मा आ शहाजी बापू पाटील यांना समर्थन दिल्याने त्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या वारसाचा पराभव केला , पण 2024 मध्ये दीपक आबा नी स्वतः उभे राहून 50,000मते घेतली आणि आ शहाजी बापू यांना पराभूत व्हावे लागले ,,
माळशिरस राखीव विधानसभा याचा अभ्यास केल्या नंतर जी मतदान आकडेवारी येते ती दोन लाख अडीज हजार यांच्या आसपास असायची ,,
माजी आमदार रामभाऊ सातपुते अतिशय आत्मविश्वासाने बोलायचे की निवडणुकीचे निकाल आल्या नंतर उत्तमराव जानकर यांना सहा महिने झोप येणार नाही ,,,
हा आत्मविश्वास त्यांना भाजपने दिलेला होता ,,
तब्बल एक लाख आठ हजार मते एडव्हांस मध्ये दिली गेल्या नंतर उर्वरित एक लाख मते उत्तम राव जानकर यांना मिळतील असा त्यांचा अंदाज होता .
प्रत्यक्षात आ उत्तमराव जानकर यांनी अपेक्षित रेंज ओलांडली , मतदानाची टक्केवारी ने उसळी मारल्याने ते एक लाख वीस हजारावर पोहचले म्हणून त्यांची शिकार होता होता ते निसटले ,,
तुम्हाला गमत वाटेल पण प्रमुख लढती सोडल्या नंतर जे अपक्ष उमेदवार असतात त्यांची सरासरी मते ही प्रत्येकी 500 असतात आणि अशी मते अनेकांना असतात ,, या बाबी कॉम्पुटर फिडींग प्रोग्राम शिवाय अश्यक्य असतात असे मला वाटते ,,
निवडणूक आयोगाच्या विरूध्द युद्ध पेटले आहे , भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला मला तटस्थ राहता येणार नाही ,,
लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुका पारदर्शी व्हाव्यात अशीच ईच्छा लोकशाहीवादी जनता करेल , आम्ही ही तीच ईच्छा मनात धरून हे लिखाण करत आहोत ,,
परिणामाची पर्वा आम्ही करत नाही , करणार नाही ,, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्प्रयासाने दिलेली लोकशाही , भारतीय राज्य घटना आम्हाला आमच्या प्राणापेक्षा अत्यंत मोलाची आहे ,
आमच्या पुढच्या पिढीच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या सारख्या च्या पिढ्या गाडल्या गेल्या तरी बेहत्तर ,,
जमिनीतून कणीस उगवायचे असेल तर ज्वारीच्या दाण्याला स्वतःला गाडून घ्यावे लागते , तेंव्हा कणीस दिसते ,,
जे सरकार निवडणुकीच्या अपारदर्शकते वर आधारित असते त्या सरकार ला जनतेचे समर्थन आहे असा दावा करता येत नाही , आणि पारदर्शक निवडणुका न घेता आलेल्या सरकारला आम्ही निर्लज्ज सरकार म्हणतो ,,,,,!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!