कायदे विषयकदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

लोकशाही वाचवण्यासाठी लोक जागृती महत्वाची


देशाच्या राष्ट्रपती; न्यायालय; संसद; निवडणूक आयोग व मिडिया हे स्पष्ट झाले आहे की हे सगळे स्तंभ कुचकामी ठरत आहेत. एका मनुवादी व्यवस्थेचे गुलाम होऊन लोकशाही राष्ट्राला आव्हान देत आहेत.हे शंभर टक्के सत्य आहे.समाज जागृती झाली पाहिजे.भाजप ;कॉंग्रेस; राष्ट्रवादी काँग्रेस; शिवसेना; मनसे हे एकच पक्ष आहेत.आणि ते मनुवादी आहेत.या बाबत आपला सर्वांचा अनुभव असला पाहिजे.यांच्या नादी जागृत भारतीय नागरिकांनी लागू नये.हे लोकशाहीचे मारेकरी भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांचे पक्ष आहेत.शत्रू स्पष्ठ तुमच्या समोर आहे. हे लोकशाहीच्या नावाखाली भारतीयांना धर्माच्या नावाखाली फसवत आले आहेत. सर्व व्यापी लोकशाही चळवळ उभी राहिली पाहिजे. मनुवादी पक्षांची डोकी खोक्यात अडकली आहेत.सावधान या देशाच्या संविधानाने या देशातील मागासवर्गीय हिंदू ओबीसी ;एससी; एसटी ; एनटी; एसबीसी व बौद्ध ; मुसलमान; शीख; ख्रिश्चन यांना संविधानाच्या मार्फत हक्क; अधिकार; स्वातंत्र्य दिले आहे.ते मनुवादी पक्षांनी गेल्या साठ सत्तर वर्षात पायदळी तुडवून लोकांना जो धर्म भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नाही त्या धर्मांध वातावरणात शिक्षित लोकांना; अशिक्षित लोकांना ढकलले आहे. आणि त्यामुळे देशात अंधभक्तांची बिनडोक फौज तयार झाली आहे.त्यामुळे भारत राष्ट्राला अंधभक्त ; दहशतवादी यांपासून धोका निर्माण झाला आहे. तेव्हा वर उल्लेख केलेल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन आपली मनुवादी (भांडवलशाही व ब्राम्हणशाही) विरहीत राजकीय नवीन व्यवस्था निर्माण करून तसे आपण बहुसंख्य आहोत.या देशाचे खरे मालक आपण आहोत.सत्ता बहुजन समाजाच्या हातात घेणे गरजेचे आहे.नाहीतर मनुवादी धर्म मागासवर्गीय हिंदू ओबीसी; एससी; एसटी; एनटी; एसबीसी व बौद्ध; मुसलमान ;शीख ; ख्रिश्चन यांना त्यांचे संविधानिक हक्क;अधिकार; स्वातंत्र्य नाकारल्याशिवाय रहाणार नाहीत.१९५१ साली पहिला विरोध ओबीसींच्या आरक्षणाला व जातगणनेल्या या देशातील मनुवादी (भांडवलशाही व ब्राम्हणशाही) यांनी विरोध केला आहे. सत्तर वर्षात वरील समुहाचे हक्क; अधिकार; स्वातंत्र्य हे लोक पायदळी तुडवीत आले आहेत.आज तर त्याचा कहर झाला आहे. यासाठी मनुवादी व्यवस्थेने धर्माचा वापर करून या देशात अंधभक्त तयार केले आहेत.ते अंधभक्त या सार्वभौम राष्ट्राला मुठभर मनुवादी (भांडवलशाही व ब्राम्हणशाही) लोकांसाठी आव्हान देत आहेत. त्या अंधभक्तांचा अंत किती भयानक आहे ते अंधभक्तांना ठाऊक नाही. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की राजकारणात धर्म सत्तेची लुडबुड सुरू झाली तर जनता भाकरीला मोताद होईल.आज अंधभक्तांनी धर्म सत्तेला डोक्यावर घेऊन स्वताच्या भाकरीला मोताद होण्याची परिस्थिती धर्मांध लोकांच्या नादी लागून ओढवून घेतली आहे.हे प्रबोधनकार ठाकरे यांचे शब्द खरे ठरत आहेत.
आपण साठ सत्तर वर्ष काटा छापा हा खेळ खेळत बसलो. काटा हा काट्याने काटा काढतो.तर छापा हा छापेमारी करतो.हाच अनुभव आपला सर्वांचा आहे.आता आमची लोकशाहीचे मारेकरी भांडवलशाही व ब्राम्हणशाही (मनुवादी) यांच्या विरहीत बहुजन आघाडी आम्ही तयार करून हा काटा छापा खेळ बंद केला पाहिजे.
ज्या लोकांनी रूपये ५००/- नंतर १०००/- व आता २०००/- व ५०००/- रूपये घेऊन मत विकतात त्यांच्या मुळे आज लोकशाही धोक्यात आली आहे.खरेतर पैसे घेऊन मत विकणारे लोकशाही द्रोही म्हणजेच देशद्रोही ठरतात.त्यांच्यामुळे आज देशाची अवस्था केविलवाणी झाली आहे.देश रसातळाला चालला आहे तरी लोक टाळ्या थाळ्या व दिवे लावून नाचत आहेत.यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही.
भारतीयांनो देशाचे दुश्मन (जेधे ; जवळकर यांचे पुस्तक) भारत गुलाम राष्ट्र व्हावे म्हणून १९४७ पासुन कार्यरत आहेत.भारताचे दुश्मन कोणी मुसलमान; पाकिस्तान नाही.तर जेधे जवळकर यांचे देशाचे दुश्मन हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येईल.
आपला
भारतीय
प्रथम भारतीय व अंतिम भारतीय

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!