
नाही जन्मला, प्रतिपालक राजा,
साकारले, स्वप्नं स्वराज्याचे,
असतांना साथीला, मावळे बेताचे,
देऊन धडे, गनिमी काव्याचे,
उधळले बेत, परकीय वैर्यांचे,
दाखवले बळ, मराठी मुलखाचे.!
नाही जन्माला, प्रतिपालक राजा,
ज्याने जमविला,
जिवाभावाचा गोतावळा,
उखडून, जातीपातीचा मळा,
घेतले कवेत सर्वांना,
संबोधून, शूर इमानी मावळा.!
नाही जन्मला, प्रतिपालक राजा,
पदरी बाळगला,
खजिना इमानी यवनांचा,
जिवाचे बलिदान करणार्यांचा,
राजांचा जीव वाचविणार्यांचा,
उभारल्या मशिदी गडकिल्ल्यांवर,
राखला मान, परधर्माचा.!
नाही जन्मला प्रतिपालक राजा,
ज्याला चाड होती ,
माय भगिनींच्या सन्मानाची, अब्रूची, अन रक्षणाची,
नाही केली पर्वा , शिक्षा फर्मावतांना ,
बलात्कारित, आप्त स्वकीयांचे,
हात, पाय छाटण्याची.!
नाही जन्मला दुजा राजा,
ज्याने सन्मानिले, वैर्याच्या सुना,
चोळी बांगडी करून,
केली सुखरूप रवाना,
नाही आवरला हुंदका तिला,
परत जातांना.!
नाही जन्मला प्रतिपालक राजा,
ज्याने फर्माविले शूर मावळ्यांना,
मोहिमेवर जातांना,
नका उधळू घोडे चौफेर,
घ्या काळजी ,
रयतेच्या उभ्या पिकाची,
श्रमाची, गाळलेल्या घामाची,
वाट धरा फकस्त बांधा, बांधाची.!
करतो उदो उदो,
महाविभूतीचा अभिमानाने,
म्हणवून, घेतो अनुयायी,
छत्रपतींचे गर्वाने,
दणाणून सोडतो आसमंत,
जयजयकाराने,
पण वाटते कृती बघता,
विसरलो की काय,आदर्श राजांचा?
का करतोय राजकारण?
धर्मद्वेषाचे विष पेरून,
माणसांचे मुडदे पाडण्याचे,
जाती, जातींमध्ये,भांडणे लावण्याचे,
दंगली घडवून, दहशतीचे,
भाषेवरून, कलागती करण्याचे.!
कळते पण वळत नाही,
पेरले ते उगवणार, भविष्यात
विषवृक्षाचे, महावृक्ष होतील,
येणार्या काळात,
जातीयतेच्या द्वेषाने, वैराच्या भिंती,
अधिक मजबूत होतील,
पुढील वेळात,
त्यामुळे होईल नुकसान,
सर्वांचेच अतोनात.!
म्हणुन करावीशी वाटते विनंती,
संविधानाने, ह्या देशाच्या,
दिलंय स्वातंत्र्य,
धर्माचे, भाषेचे,
जातीभेदाला पायबंद घालण्याचे,
धोरण ठरवा, सामोपचाराचे,
परस्पर संवादाचे, शांततेचे,
सर्वांच्या धर्माचा, मान राखण्याचे.!
सर्वांच्या धर्माचा, मान राखण्याचे.!!
सर्वांच्या धर्माचा,
मान राखण्याचे.!!!
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…02/08/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत