‘रिपब्लिकन स्कुल’ने आशा बळावतात !

🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
‘द रिपब्लिकन’चे आयोजन आवडले. विचारांची स्पष्टता येण्यास ते पूरक आहे. यासाठी द रिपब्लिकनचे कर्णधार हर्षवर्धन ढोके यांचे अभिनंदन करावे. ते ही बौध्दिकता परिश्रमपूर्वक राबवितात.
चिरंजीव हर्षवर्धन हा बऱ्याच वर्षापासून माझ्या मनात आहे. तो आवडतो. त्याची स्पष्टता आवडते. या आवडीतून प्रशिक्षण वर्गाला नाव नोंदविले. बऱ्यापैकी उपस्थिती होती. पन्नासेक असतील. सर्व वयोगटातील होते. आमदार निवासच्या सभागृहात हे आयोजन झाले. राजकारणातील प्रवेशाचे प्रशिक्षण देणारी ही एक दिवसीय शाळा नक्कीच आवडली.
हर्षवर्धन ढोके यांनी आयोजनामागची भूमिका विशद केली. तीत तळमळीचा तथ्यांश खूप मोठा होता. हिंगणघाटचे नवीन इंदुरकर यांनी संचलन केले. उपस्थितांमधील प्रसन्नचित्तता लक्षवेधी होती. नागपूर आणि नागपूर बाहेर , दोन्हीकडून मंडळी आलेली दिसली.
या एक दिवसीय शाळेचे अध्यक्षस्थान मला देण्यात आले.
प्रारंभी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी वर्ग घेतला. त्यांनी प्रारंभालाच मी इथे 'तज्ञ अभ्यासक' म्हणून आलो असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी 'राजकीय साक्षरता' हा विषय निवडला होता. विषयाला पूर्ण न्याय देणारे व्याख्यान त्यांनी केले. संपूर्ण देशातील राजकारणाचा सुंदर आढावा घेतला.
त्यानंतर सर्वपरिचित डॉ एन व्ही ढोके हे बोलले. नेहमीप्रमाणे ते तडाखेबंद बोलले. अधूनमधून खडुफळा हा आधार घेतला. 'सामान्य जन व संघटन' हा त्यांचा विषय होता. रिपब्लिकन संकल्पनेला धरुन हे दोन्ही मुद्दे त्यांनी ताकदीने मांडले. अत्यंत मुद्देसूदपणे विषय समजावून दिला.
शेवटी माझे अध्यक्षीय भाषण झाले. आयोजनाच्या यशस्वीतेत ज्योती खोब्रागडे यांचा मोठा वाटा दिसला. सर्वांचे धन्यवाद व समारोप वंदना जीवणे यांनी घेतला. या प्रशिक्षण वर्गाला सुरेश मुन , संतोष शिवणकर , सुचेंद्र मंडपे , अरविंद थोरात , रेवाराम शामकुवर , आरती टेंभुरकर , प्रफुल्ल गजभिये , रवी ढोके , विक्रांत गडपायले सह मोठी उपस्थिती होती.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत